Wednesday, July 15, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

‘वर्षा’वरील मध्यरात्रीच्या भेटीवर जयंत पाटील यांचे स्पष्टीकरण; काय म्हणाले..

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 15, 2026
in महाराष्ट्र, राजकारण
0
राष्ट्रवादीचे बंडखोर नेते शरद पवारांच्या भेटीला ; जयंत पाटलांनी सांगितलं भेटीत काय झालं ते..
बातमी शेअर करा..!

मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ शासकीय निवासस्थानी मध्यरात्री झालेल्या बैठकीनंतर राज्याच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आले होते. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जयंत पाटील, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल हे एकाचवेळी वर्षा बंगल्यावर दिसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य राजकीय भूमिकेबाबत तर्कवितर्कांना उधाण आले होते. मात्र, या सर्व चर्चांवर आता जयंत पाटील यांनी स्वतःच स्पष्टीकरण दिले आहे.

माध्यमांशी संवाद साधताना जयंत पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट त्यांनी पूर्वनियोजित वेळ घेऊनच घेतली होती. वेळ पुढे गेल्यामुळे काही काळ प्रतीक्षा करावी लागली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपल्या मतदारसंघातील नगराध्यक्ष अपात्र ठरविण्याच्या प्रकरणाबाबत चर्चा केली.

पाटील म्हणाले, “मी मुख्यमंत्र्यांना माझ्या मतदारसंघातील नगराध्यक्ष अपात्र ठरविण्यात आल्याचा विषय सांगितला. त्यावर त्यांनी माहिती घेऊन दोन दिवसांत कळवतो, असे आश्वासन दिले. या विषयावर नगरविकास मंत्र्यांनाही भेटण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ते उपलब्ध नसल्याने मी थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.”

“मी हॉलमध्ये एकटाच होतो”

जयंत पाटील यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर ते काही वेळ वर्षा बंगल्याच्या हॉलमध्ये बसून होते. त्यावेळी मुख्यमंत्री अन्य बैठकीत व्यस्त होते. “मी हॉलमध्ये एकटाच होतो. सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल कधी आले किंवा ते कोणत्या कारणासाठी आले, याची मला कोणतीही माहिती नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

“विलिनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम”

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) एनडीएमध्ये जाणार किंवा पक्षाच्या विलिनीकरणाबाबत चर्चा सुरू असल्याच्या वृत्तांचेही जयंत पाटील यांनी खंडन केले. “माझ्या भेटीचा आणि अशा कोणत्याही राजकीय चर्चेचा काहीही संबंध नाही. मी केवळ नगराध्यक्ष अपात्र ठरविण्याच्या विषयासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटलो होतो,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

दरम्यान, वर्षा बंगल्यावर झालेल्या या भेटीनंतर निर्माण झालेल्या राजकीय चर्चांना जयंत पाटील यांच्या स्पष्टीकरणानंतर काही प्रमाणात पूर्णविराम मिळाला असला, तरी राज्यातील राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष कायम आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

राज्यात पुन्हा पावसाचे पुनरागमन होणार; जळगावसह अनेक जिल्ह्यांना विजांसह पावसाचा इशारा

Next Post

NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडमध्ये 114 पदांची भरती; 31 जुलैपर्यंत करा अर्ज

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड मोठी पदभरती; तरुणांना सरकारी नोकरीची संधी

NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडमध्ये 114 पदांची भरती; 31 जुलैपर्यंत करा अर्ज

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड मोठी पदभरती; तरुणांना सरकारी नोकरीची संधी

NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडमध्ये 114 पदांची भरती; 31 जुलैपर्यंत करा अर्ज

July 15, 2026
राष्ट्रवादीचे बंडखोर नेते शरद पवारांच्या भेटीला ; जयंत पाटलांनी सांगितलं भेटीत काय झालं ते..

‘वर्षा’वरील मध्यरात्रीच्या भेटीवर जयंत पाटील यांचे स्पष्टीकरण; काय म्हणाले..

July 15, 2026
बिपरजॉय चक्रीवादळाचा राज्यातील या जिल्ह्याना बसणार फटका : हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

राज्यात पुन्हा पावसाचे पुनरागमन होणार; जळगावसह अनेक जिल्ह्यांना विजांसह पावसाचा इशारा

July 15, 2026
शिंदे-फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा ; वाचा काय आहे?

CAG अहवालानंतर मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडमध्ये ; शिंदेंच्या खात्यासह ‘या’ तीन विभागांना नोटीस

July 14, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page