सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. बृहन्मुंबई विद्युतपुरवठा आणि परिवहन (BEST) उपक्रमात 364 बस वाहक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले असून अर्ज करण्याची अंतिम मुदत 29 जुलै 2026 आहे.
पात्रता काय?
या भरतीअंतर्गत बस वाहक पदासाठी उमेदवाराने किमान 50 टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराकडे वैध बस वाहक परवाना आणि बिल्ला असणे अनिवार्य आहे.
शारीरिक पात्रतेनुसार उमेदवाराची उंची किमान 154 सेंटीमीटर आणि कमाल 178 सेंटीमीटर, तर वजन किमान 45 किलो असावे. वयोमर्यादा 29 जुलै 2026 रोजी 18 ते 38 वर्षे असून, मागासवर्गीय उमेदवारांना नियमानुसार 5 वर्षांची सवलत देण्यात येणार आहे.
परीक्षा शुल्क
निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती मुंबई येथे होणार आहे. अर्ज शुल्क खुल्या प्रवर्गासाठी 1,000 रुपये, तर राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये निश्चित करण्यात आले आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून 29 जुलै 2026 रोजी रात्री 11:55 वाजेपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. हे अर्ज बेस्ट उपक्रमाच्या www.bestundertaking.com या वेबसाईटवरील Recruitment या शीर्षकाखाली दिलेल्या लिंकवर जाऊन भरता येतील. लेखी परीक्षा किंवा पुढील निवड प्रक्रियेचे वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येणार आहे.
वेतनश्रेणी आणि भत्ते – मूळ वेतन 22,060/- + महागाई भत्ता + घरभाडे भत्ता + वैद्यकीय भत्ता रुपये + गणवेश धुलाई भत्ता तसेच रजेचे रोखीकरण, रजा प्रवास भत्ता, उपक्रमाच्या बसमधून मोफत प्रवास सुविधा (एकंदरीत अंदाजे रुपये 36,000 रुपये)
सरकारी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या आणि आवश्यक पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.















Discussion about this post