बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छित असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड (MSC Bank) अंतर्गत विविध पदांच्या एकूण १३९ जागांसाठी अधिकृत भरती जाहीर झाली आहे. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना १ जुलै २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
कोणत्या पदांसाठी भरती?
ट्रेनी ज्युनियर ऑफिसर – ४९ पदे
ट्रेनी असोसिएट – ८१ पदे
ट्रेनी टायपिस्ट – ४ पदे
ट्रेनी ड्रायव्हर – ५ पदे
भरतीसाठी पात्रता काय?
ट्रेनी ज्युनियर ऑफिसर पदासाठी ५० टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी आणि दोन वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. ट्रेनी असोसिएट पदासाठी ५० टक्के गुणांसह पदवी आवश्यक आहे.
ट्रेनी टायपिस्ट पदासाठी पदवीसह मराठी टायपिंग ३० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टायपिंग ४० शब्द प्रति मिनिट वेग आवश्यक आहे. तर ट्रेनी ड्रायव्हर पदासाठी १० वी उत्तीर्ण आणि हलके वाहन चालविण्याचा (LMV) वैध परवाना आवश्यक आहे.
वयोमर्यादा
१ जून २०२६ रोजीच्या स्थितीनुसार ट्रेनी ज्युनियर ऑफिसर पदासाठी २३ ते ३५ वर्षे, ट्रेनी असोसिएट आणि ट्रेनी टायपिस्ट पदांसाठी २१ ते ३२ वर्षे, तर ट्रेनी ड्रायव्हर पदासाठी १८ ते ३० वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
अर्ज शुल्क आणि नोकरीचे ठिकाण
ट्रेनी ज्युनियर ऑफिसर पदासाठी ₹१,७६०, तर उर्वरित पदांसाठी ₹१,१८० अर्ज शुल्क आकारण्यात येणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती संपूर्ण महाराष्ट्रात केली जाणार आहे.
१ जुलैपर्यंत अर्जाची मुदत
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन सुरू असून, १ जुलै २०२६ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. इच्छुक उमेदवारांनी मुदतीपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.















Discussion about this post