नवी दिल्ली : आजाद समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार चंद्रशेखर आझाद यांनी मंगळवारी संसद परिसरात आंदोलन करत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. NEET परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरण आणि CJP (कॉकरोच जनता पार्टी) मोर्चादरम्यान झालेल्या पोलिस कारवाईबाबत त्यांनी सरकारला धारेवर धरले.
संसद भवनाबाहेर निदर्शने करताना चंद्रशेखर आझाद यांनी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या NEET पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. तसेच CJP मोर्चावर करण्यात आलेल्या पोलिस लाठीचार्ज आणि कारवाईबाबतही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
सरकार विरोधी आवाज दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत त्यांनी लोकशाहीमध्ये शांततापूर्ण आंदोलन हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचे सांगितले. विद्यार्थी, युवक आणि वंचित घटकांवरील अन्यायाविरोधात संघर्ष सुरूच राहील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
या दोन्ही मुद्द्यांवर केंद्र सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी चंद्रशेखर आझाद यांनी आंदोलनादरम्यान केली. संसद परिसरातील या आंदोलनामुळे काही काळ राजकीय वातावरण तापले होते.















Discussion about this post