Thursday, September 17, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राजकारण

20 दिवसानंतर मनोज जरांगे-पाटलांनी उपोषण सोडले

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 17, 2026
in राजकारण, महाराष्ट्र
0
मनोज जरांगे यांचा ओबीसी नेत्यांवर गंभीर आरोप ; काय आहे वाचा
बातमी शेअर करा..!

मुंबई । मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तब्बल २० दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाची अखेर मध्यरात्री सांगता केल्यानंतर मनोज जरांगे पाटील आता उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने रवाना झाले आहेत. राज्य सरकारच्या शिष्टमंडळाकडून देण्यात आलेल्या आश्वासनानंतर जरांगे यांनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बीड जिल्ह्यातील पाटोदा येथून ते सहकाऱ्यांसह संभाजीनगरकडे निघाले आहेत.

जरांगे पाटील यांचा कालचा मुक्काम पाटोदा येथे होता. उपोषणाची सांगता झाल्यानंतर त्यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत.

दरम्यान, जरांगे संभाजीनगरकडे रवाना झाल्याची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी आपले नियोजित कार्यक्रम रद्द केले. तेही जरांगे पाटील यांच्यासोबत संभाजीनगरच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती आहे.

प्रकृती खालावल्याने आंदोलनस्थळीच वैद्यकीय उपचार

गेल्या काही दिवसांपासून उपोषणामुळे जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत होती. काल त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने आंदोलनस्थळीच त्यांना सलाईन लावण्यात आली होती. डॉक्टरांनी त्यांना प्रवास टाळून तातडीने रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला होता. वैद्यकीय तपासणीत त्यांना अतिसाराचा त्रास झाल्याचे सांगण्यात आले. तसेच लघवीच्या अहवालात किटोन आढळून आल्याची माहिती देण्यात आली. दीर्घकाळ अन्न-पाण्याचा त्याग केल्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली होती.

जरांगे यांच्या हृदयाचे ठोके, रक्तदाब आणि ऑक्सिजनची पातळी यावर आंदोलनस्थळीच डॉक्टरांकडून लक्ष ठेवण्यात येत होते. प्रकृती आणखी खालावू नये यासाठी ICU मॉनिटरचीही व्यवस्था करण्यात आली होती.

चार ते पाच दिवस रुग्णालयात उपचाराची शक्यता

जरांगे पाटील यांची प्रकृती लक्षात घेता त्यांना गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करून उपचार करण्याची तयारी करण्यात आली आहे. डॉक्टरांच्या अंदाजानुसार त्यांना किमान चार ते पाच दिवस रुग्णालयात उपचार घ्यावे लागू शकतात. त्यानंतरही काही काळ विश्रांती घेण्याचा सल्ला दिला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, २० दिवसांच्या उपोषणानंतर जरांगे पाटील यांनी आंदोलनाची सांगता केल्यानंतर आता त्यांच्या प्रकृतीकडे समर्थकांचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

SC-ST शेतकऱ्यांसाठी मोठी संधी! सूक्ष्म सिंचनासाठी मिळणार इतके टक्के अनुदान?

Next Post

मनोज जरांगे-पाटलांनी उपोषण मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
मराठा समाजासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; लाखो मराठा आंदोलक मुंबईत असताना वेधलं लक्ष

मनोज जरांगे-पाटलांनी उपोषण मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मी मुख्यमंत्री असतो तर…; उद्धव ठाकरेंचे राज्य सरकारवर हल्लाबोल

‘पुढच्या वेळी भाजप सत्ता पाहणार नाही’; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा, मराठवाड्यासाठी केली मोठी मागणी

September 17, 2026
जळगावात सोने-चांदी दराने तोडले आजपर्यंत सगळे रेकॉर्ड ; आता एक तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये?

गणेशोत्सवात सोने-चांदी खरेदीदारांना दिलासा! जळगावात सोनं ₹१,७५१, तर चांदी ₹३,०९० ने स्वस्त

September 17, 2026
राज्यात कुठे तापमान वाढ, तर कुठे वादळी पावसाचा इशारा ; तुमच्या जिल्ह्यातील स्थिती जाणून घ्या..

पावसाची उघडीप अन् जळगावात उकाडा वाढला; पुढील काही दिवसांसाठी हवामान विभागाचा अंदाज

September 17, 2026
जमीनमालकांसाठी मोठी बातमी; कर्ज घेताना एनए परवानगीची सक्ती संपली!

जमीनमालकांसाठी मोठी बातमी; कर्ज घेताना एनए परवानगीची सक्ती संपली!

September 17, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page