Saturday, May 30, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

..तर सरकारला जड जाईल; रखरखत्या उन्हात मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण सुरू, सरकारला दिला थेट इशारा!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 30, 2026
in महाराष्ट्र
0
आता छातीवर गोळ्या पडल्या तरी.. मनोज जरांगे झाले आक्रमक
बातमी शेअर करा..!

मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचे हत्यार उपसले असून, रखरखत्या उन्हात मोकळ्या मैदानात उपोषणाला बसण्याचा निर्धार केला आहे. त्यांच्या या आंदोलनासाठी राज्यभरातून मराठा बांधव अंतरवाली सराटीकडे दाखल होत असून, या आंदोलनाची राज्यासह देशभरात चर्चा रंगली आहे.

उपोषणाला बसण्यापूर्वी माध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला कडक इशारा दिला. “आंदोलन उधळण्याचा प्रयत्न सरकारने करू नये. यापूर्वी एकदा हल्ला झाला आहे. पुन्हा पोलिसांकडून लाठीचार्ज किंवा दडपशाही करण्याचा प्रयत्न झाला तर त्याचे गंभीर परिणाम होतील. राज्यातील कानाकोपऱ्यात तीन ते चार महिने आंदोलन पेटेल,” असा इशारा त्यांनी दिला.

सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करताना त्यांनी दोन लाखांहून अधिक सापडलेल्या नोंदीधारकांना त्वरित कुणबी प्रमाणपत्र देण्याचे आदेश प्रशासनाला द्यावेत, असे सांगितले. हैदराबाद गॅझेट आणि इतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे अर्ज करणाऱ्यांना प्रमाणपत्र देण्याबाबत स्पष्ट निर्देश शासनाने काढावेत, अशी त्यांची मागणी आहे.

यावेळी त्यांनी मराठा-कुणबी मंत्रालय स्थापन करण्याची मागणीही पुन्हा केली. “मुख्यमंत्र्यांनी फक्त घोषणा करण्याची गरज आहे. सरकार स्तरावरून अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना गेल्या पाहिजेत. जीआर कितीही चांगला काढला तरी त्याला न्यायालयात आव्हान दिले जाते. त्यामुळे समाजाला प्रत्यक्ष लाभ मिळेल असे निर्णय घेणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.

राजकीय पक्षांबाबत भूमिका स्पष्ट करताना जरांगे पाटील म्हणाले, “भाजपचा मंत्री येऊ द्या किंवा शिवसेनेचा, आम्हाला कोणत्याही पक्षाशी देणे-घेणे नाही. आमचे देणे-घेणे फक्त मराठा समाजाच्या प्रश्नांशी आणि शासन निर्णयांशी आहे.”

तसेच, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून त्यांनी संवादातून मार्ग काढण्याचे आवाहन केले. “गोडीगुलाबीने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. आंदोलनावर लाठीचार्ज झाला तर राज्यातील एकही भाग शांत राहणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, अंतरवाली सराटी येथे सुरू होणाऱ्या या आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा निर्णायक टप्प्यावर पोहोचण्याची चिन्हे दिसत आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

देशभरातील हवामानाचा मोठा बदल! १५ राज्यांत वादळी पाऊस, जळगावसह महाराष्ट्रातही यलो अलर्ट

Next Post

जळगाव जिल्ह्यात लाचखोरीचे सत्र कायम; भुसावळात पीएसआयसह खाजगी इसमावर गुन्हा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
मोठी बातमी! 20 हजाराची लाच घेताना पोलीस अधिकारी ACB च्या जाळ्यात

जळगाव जिल्ह्यात लाचखोरीचे सत्र कायम; भुसावळात पीएसआयसह खाजगी इसमावर गुन्हा

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
12वी पाससाठी खुशखबर! जळगाव पोलीस विभागामार्फत ‘पोलीस शिपाई’ पदांसाठी भरती जाहीर

जळगाव पोलिस दलात मोठे खांदेपालट; ४३ पीएसआयसह तब्बल ३९९ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

May 30, 2026
साखरपुडा मोडून बॉयफ्रेंडशी लग्न; माहेरी येताच संतापलेल्या पित्याने पोटच्या मुलीला संपविले

साखरपुडा मोडून बॉयफ्रेंडशी लग्न; माहेरी येताच संतापलेल्या पित्याने पोटच्या मुलीला संपविले

May 30, 2026
जळगावच्या टॉवर चौकातील लॉजवर पोलिसांचा छापा; ‘वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश , पीडित महिलांची सुटका

चोपड्यात देहव्यापाराच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा; नेपाळ-राजस्थानच्या पाच महिलांची सुटका

May 30, 2026
कक्ष अधिकारी पदोन्नतीसाठीच्या विभागीय परिक्षेसंदर्भातील निकषाबाबत महिन्याभरात बैठक घेणार – मंत्री गुलाबराव पाटील

विधान परिषदेवरून महायुतीत कलगीतुरा! जळगावची जागा भाजपला गेल्याच्या बातमीने मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईला रवाना

May 30, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page