मुंबई । मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्यात आज अंतरवाली सराटी येथे एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या भेटीदरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या, विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि अंतरवाली सराटीत झालेल्या लाठीचार्जच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर अत्यंत तीव्र शब्दांत निशाणा साधला.
प्रसाद लाड यांच्याशी बोलताना मनोज जरांगे यांनी शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. जरांगे म्हणाले, “राज्यातील ८० हजार मराठा विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती थांबली आहे. मी गेल्या ८ महिन्यांत विखे पाटील यांना अनेकदा फोन करून हा विषय त्यांच्या कानावर घातला. महामंडळाच्या विषयात परतावे मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे तब्बल ६०० कोटी रुपये थकले आहेत. यामुळे गरीब मराठा मुलांचे सिबील स्कोअर खराब झाले आहेत. मी केवळ आरोप करायचा म्हणून खोटे आरोप करत नाही, तर पुराव्यांसह बोलत आहे.
अनेक लोकांना वाटते की मी केवळ मुख्यमंत्र्यांवर टीका करतो. पण मुख्यमंत्री ही व्यक्ती आमच्यासाठी शत्रू किंवा दुश्मन नाही. जर ते आमचे शत्रू असते, तर याच मराठा समाजाने त्यांना निवडून दिले असते का? मला तुमच्याशी हे बोलावं लागणार आहे. आम्ही मुख्यमंत्र्याला, उपमुख्यमंत्र्याला काय वाईट बोललो का, मग आम्हाला का मारायचं. मी पैशाने, पदाने फुटत नाही. मला कोणी दाखवून द्यावं की मी एक रुपया घेतला, मी उद्या सकाळी फाशी घेतो, नाही घेतला तर दोन बापाचा औलाद. सरकारने फक्त एकदा सांगावं की याला १ रुपया दिला, ७०० रुपयाचं काम दिलंय, हे कोणीही सांगावं, असे ओपन चॅलेंज मनोज जरांगे पाटील यांनी दिले















Discussion about this post