Friday, November 6, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

भुसावळमध्ये एमडी ड्रग्जविरोधात पोलिसांची मोठी कारवाई; चौघे ताब्यात, ७.२८ लाखांचा मुद्देमाल जप्त

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 6, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
भुसावळमध्ये एमडी ड्रग्जविरोधात पोलिसांची मोठी कारवाई; चौघे ताब्यात, ७.२८ लाखांचा मुद्देमाल जप्त
बातमी शेअर करा..!

भुसावळ । अंमली पदार्थांच्या अवैध धंद्यांविरोधात जळगाव पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई केली आहे. भुसावळ तालुक्यातील किन्ही एमआयडीसी परिसरात शुक्रवारी पहाटे पोलिसांनी अचानक छापा टाकत एमडी ड्रग्जचा साठा उघडकीस आणला. या कारवाईत चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून ६२.२१ ग्रॅम मेफेड्रोनसह दोन दुचाकी आणि चार मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. जप्त केलेल्या साहित्याची एकूण किंमत ७ लाख २८ हजार ८४० रुपये आहे.

किन्ही एमआयडीसी परिसरात पहाटेच्या वेळी काही जण दुचाकींवरून येऊन संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची गांभीर्याने दखल घेत भुसावळ तालुका पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त मोहीम आखली. शुक्रवारी ६ नोव्हेंबर रोजी पहाटे २.५५ वाजेच्या सुमारास पोलिस पथकाने संबंधित ठिकाणी छापा मारला. या वेळी पोलिसांच्या ताब्यात चार जण आले.

या कारवाईत रिशभ कुणाल खेडकर (१८, रा. कंडारी), प्रथमेश दिलीप आव्हाड (२७, रा. दादासाहेब रुपवते सोसायटी), शेख अफजल शेख रहेमतुल्ला (२६, रा. नसरंजी फाईल) आणि असगरखान अनवरखान (५७, रा. अयान कॉलनी, भुसावळ) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

एका आरोपीकडून ५५ ग्रॅमपेक्षा अधिक ड्रग्ज

पोलिसांनी केलेल्या झडतीत ६२.२१ ग्रॅम एमडी पावडर मिळून आली. या अंमली पदार्थाची किंमत २ लाख ४८ हजार ८४० रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, एकूण जप्त साठ्यापैकी ५५.३३ ग्रॅम एमडी असगरखान अनवरखान याच्याकडून मिळाली. याशिवाय रॉयल एनफिल्ड बुलेट आणि पल्सर या दोन दुचाकी, तसेच आयफोन १६, आयफोन १३ यांसह चार मोबाईल फोनही जप्त करण्यात आले. दुचाकींची किंमत ३ लाख २५ हजार रुपये, तर मोबाईलची किंमत १ लाख ५५ हजार रुपये आहे. अंमली पदार्थ आणि इतर साहित्य मिळून पोलिसांनी ७ लाख २८ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.

पुरवठ्याचे धागेदोरे शोधण्याचे आव्हान

या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २२६/२०२६ दाखल करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क), २२(क) आणि २९ नुसार कारवाई करण्यात आली आहे. या एमडी ड्रग्जचा पुरवठा कुठून झाला, त्याची विक्री कोणाला केली जाणार होती आणि या व्यवहारामागे आणखी कोणाचे जाळे आहे, याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.

परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी तथा भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी प्रशांत दरेकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह तालुका पोलीस आणि एलसीबीच्या पथकाने मोहिमेत सहभाग घेतला. पहाटेच्या या कारवाईमुळे भुसावळ परिसरातील अंमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांवर पोलिसांनी जोरदार प्रहार केला आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

ओबीसी उमेदवारांसाठी मोठा दिलासा; क्रिमी लेयर ठरवण्याचे निकष सर्वोच्च न्यायालयाने केले स्पष्ट

Next Post

पंजाबमध्ये धावत्या कर्मभूमी एक्स्प्रेसला भीषण आग; ४ डबे जळून खाक, प्रवाशांमध्ये एकच धावपळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
पंजाबमध्ये धावत्या कर्मभूमी एक्स्प्रेसला भीषण आग; ४ डबे जळून खाक, प्रवाशांमध्ये एकच धावपळ

पंजाबमध्ये धावत्या कर्मभूमी एक्स्प्रेसला भीषण आग; ४ डबे जळून खाक, प्रवाशांमध्ये एकच धावपळ

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
पंजाबमध्ये धावत्या कर्मभूमी एक्स्प्रेसला भीषण आग; ४ डबे जळून खाक, प्रवाशांमध्ये एकच धावपळ

पंजाबमध्ये धावत्या कर्मभूमी एक्स्प्रेसला भीषण आग; ४ डबे जळून खाक, प्रवाशांमध्ये एकच धावपळ

November 6, 2026
भुसावळमध्ये एमडी ड्रग्जविरोधात पोलिसांची मोठी कारवाई; चौघे ताब्यात, ७.२८ लाखांचा मुद्देमाल जप्त

भुसावळमध्ये एमडी ड्रग्जविरोधात पोलिसांची मोठी कारवाई; चौघे ताब्यात, ७.२८ लाखांचा मुद्देमाल जप्त

November 6, 2026
आई-वडील IAS मग मुलांना आरक्षण कशाला? सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

ओबीसी उमेदवारांसाठी मोठा दिलासा; क्रिमी लेयर ठरवण्याचे निकष सर्वोच्च न्यायालयाने केले स्पष्ट

November 6, 2026
गुडन्यूज ! धनत्रयोदशीच्या दिवशी जळगावच्या सुवर्णनगरीत सोने ३००० रुपयांनी घसरले

धनत्रयोदशीला सोने चांदीचे दर धडाम ; जळगाव सराफ बाजारात आजचे नवीन दर काय? जाणून घ्या

November 6, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page