Saturday, August 29, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

राज्यातील या जिल्ह्यांना आज पावसाचा इशारा; जळगाव पावसाची काय स्थिती?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 29, 2026
in जळगाव जिल्हा
0
IMD चा पावसाबाबत धोक्याचा इशारा; महाराष्ट्रासह 14 राज्यांना हाय अलर्ट 
बातमी शेअर करा..!

जळगाव ।राज्यात सध्या श्रावण सरींचा लपंडाव सुरू असून, काही भागांत जोरदार पाऊस तर काही ठिकाणी पावसाने दडी मारल्याचे चित्र आहे. भारतीय हवामान विभागाने आज पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार सरींची शक्यता व्यक्त केली असून, या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यातील हिंगोली, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांतही तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे.

उर्वरित राज्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून, काही भागांत ऊन-सावल्यांचा खेळ सुरू राहणार आहे. मात्र, जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात दमदार पावसाची शक्यता सध्या कमी आहे.

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात तुरळक सरी

जळगाव जिल्ह्यात ढगांची दाटी कायम असली तरी जोरदार पावसासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात उत्तर महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्यात पावसाची स्थिती तुरळक राहण्याचा अंदाज आहे. काही भागांत हलक्या सरी कोसळू शकतात; मात्र मध्यम किंवा जोरदार पावसाची ठोस चिन्हे सध्या दिसत नाहीत.

कमी दाबाचे पट्टे जळगावपासून दूर

सध्या मध्य प्रदेशाच्या ईशान्य भागात तसेच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे पट्टे सक्रिय आहेत. मात्र, त्यांची दिशा ओडिशा, छत्तीसगड आणि पूर्व मध्य प्रदेशाकडे असल्याने त्याचा थेट परिणाम उत्तर महाराष्ट्रावर होण्याची शक्यता कमी आहे. उत्तर महाराष्ट्राच्या परिसरात स्वतंत्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याशिवाय जळगाव जिल्ह्यात दमदार पाऊस होण्याची शक्यता कमी असल्याचे हवामान अभ्यासकांचे मत आहे.

सप्टेंबरमध्येही पावसाचा लपंडाव?

प्रशांत महासागरातील एल निनोच्या स्थितीचाही पावसावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात जळगावसह उत्तर महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस राहू शकतो, असा अंदाज हवामान अभ्यासक नीलेश गोरे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे सध्या आकाशात ढगांची दाटी असली तरी प्रत्यक्षात दमदार पावसासाठी जळगावकरांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागू शकते.

बातमी शेअर करा..!
Previous Post

शेवटची राखी बांधून घेतली अन् ‘मी जातोय’चा मेसेज केला; जळगावात १७ वर्षीय तरुणाची आत्महत्या

Next Post

मंगला एक्सप्रेसमध्ये विद्यार्थ्यांना विषबाधेसदृश त्रास; भुसावळात पाऊण तास थांबवली ट्रेन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
मंगला एक्सप्रेसमध्ये विद्यार्थ्यांना विषबाधेसदृश त्रास; भुसावळात पाऊण तास थांबवली ट्रेन

मंगला एक्सप्रेसमध्ये विद्यार्थ्यांना विषबाधेसदृश त्रास; भुसावळात पाऊण तास थांबवली ट्रेन

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

दहावी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी! इंडिया पोस्टमध्ये २५०००+ जागांसाठी महाभरती जाहीर

दहावी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी! इंडिया पोस्टमध्ये २५०००+ जागांसाठी महाभरती जाहीर

August 29, 2026
मंगला एक्सप्रेसमध्ये विद्यार्थ्यांना विषबाधेसदृश त्रास; भुसावळात पाऊण तास थांबवली ट्रेन

मंगला एक्सप्रेसमध्ये विद्यार्थ्यांना विषबाधेसदृश त्रास; भुसावळात पाऊण तास थांबवली ट्रेन

August 29, 2026
IMD चा पावसाबाबत धोक्याचा इशारा; महाराष्ट्रासह 14 राज्यांना हाय अलर्ट 

राज्यातील या जिल्ह्यांना आज पावसाचा इशारा; जळगाव पावसाची काय स्थिती?

August 29, 2026
शेवटची राखी बांधून घेतली अन् ‘मी जातोय’चा मेसेज केला; जळगावात १७ वर्षीय तरुणाची आत्महत्या

शेवटची राखी बांधून घेतली अन् ‘मी जातोय’चा मेसेज केला; जळगावात १७ वर्षीय तरुणाची आत्महत्या

August 29, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page