Saturday, August 29, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

शेवटची राखी बांधून घेतली अन् ‘मी जातोय’चा मेसेज केला; जळगावात १७ वर्षीय तरुणाची आत्महत्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 29, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
शेवटची राखी बांधून घेतली अन् ‘मी जातोय’चा मेसेज केला; जळगावात १७ वर्षीय तरुणाची आत्महत्या
बातमी शेअर करा..!

जळगाव । आई माहेरी भावाला राखी बांधण्यासाठी गेली होती, तर वडील मुलगा रोहित आणि मुलीला घेऊन त्यांच्या बहिणीच्या घरी राखी बांधण्यासाठी गेले होते. याचदरम्यान दशरथनगर येथील १७ वर्षीय रोहित साहेबराव धनगर याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली. ऑनलाइन गेममध्ये पैसे गमावल्याने आलेल्या नैराश्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

रोहितचे वडील साहेबराव धनगर हे रोहित आणि मुलीला घेऊन मेहरुण परिसरातील त्यांच्या बहिणीच्या घरी राखी बांधण्यासाठी गेले होते. तेथे बहिणीने रोहितच्या हातावर राखी बांधली. त्यानंतर रोहित ‘घरी जातो’ असे सांगून एकटाच दशरथनगरातील घरी परतला. घरी आल्यानंतर त्याने गळफास घेऊन जीवन संपविले.

मेसेज पाहताच मित्रांची धाव

आत्महत्येपूर्वी रोहितने काही मित्रांना मेसेज पाठवून आपण आत्महत्या करीत असल्याचे कळविले. मित्रांनी हे मेसेज पाहताच तातडीने त्याच्या घरी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत रोहितने गळफास घेतला होता. घटनेची माहिती मिळताच शनिपेठ पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अभिषेक कट्यारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रोहितला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

बहिणीच्या हातून बांधलेली शेवटची राखी

रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीच्या हातून राखी बांधून घेतल्यानंतर काही वेळातच रोहितने जीवन संपविल्याने या घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. आत्महत्येपूर्वी त्याने बहिणीसाठी मोबाईलवर स्टेटस ठेवले होते. त्यात ‘हॅपी रक्षाबंधन ताई, आता सगळं तू सांभाळून घे दीदी. मम्मी-पप्पांना कधी एकटे सोडू नको, मी जातो आहे,’ असा भावनिक उल्लेख केला होता. यासोबतच काही हिंदी ओळींचा व्हिडिओही त्याने स्टेटसवर ठेवला.

ऑनलाइन गेममध्ये पैसे गमावल्यामुळे रोहित नैराश्यात असल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. या कारणातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी घडलेल्या या घटनेने लहान बहिणीसह संपूर्ण धनगर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

कारमध्ये अवैध गुटख्याची वाहतूक ; सावदा पोलिसांनी पकडला १०.२७ लाखांचा मुद्देमाल

Next Post

राज्यातील या जिल्ह्यांना आज पावसाचा इशारा; जळगाव पावसाची काय स्थिती?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
IMD चा पावसाबाबत धोक्याचा इशारा; महाराष्ट्रासह 14 राज्यांना हाय अलर्ट 

राज्यातील या जिल्ह्यांना आज पावसाचा इशारा; जळगाव पावसाची काय स्थिती?

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
दहावी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी! इंडिया पोस्टमध्ये २५०००+ जागांसाठी महाभरती जाहीर

दहावी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी! इंडिया पोस्टमध्ये २५०००+ जागांसाठी महाभरती जाहीर

August 29, 2026
मंगला एक्सप्रेसमध्ये विद्यार्थ्यांना विषबाधेसदृश त्रास; भुसावळात पाऊण तास थांबवली ट्रेन

मंगला एक्सप्रेसमध्ये विद्यार्थ्यांना विषबाधेसदृश त्रास; भुसावळात पाऊण तास थांबवली ट्रेन

August 29, 2026
IMD चा पावसाबाबत धोक्याचा इशारा; महाराष्ट्रासह 14 राज्यांना हाय अलर्ट 

राज्यातील या जिल्ह्यांना आज पावसाचा इशारा; जळगाव पावसाची काय स्थिती?

August 29, 2026
शेवटची राखी बांधून घेतली अन् ‘मी जातोय’चा मेसेज केला; जळगावात १७ वर्षीय तरुणाची आत्महत्या

शेवटची राखी बांधून घेतली अन् ‘मी जातोय’चा मेसेज केला; जळगावात १७ वर्षीय तरुणाची आत्महत्या

August 29, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page