Friday, July 3, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

दीड कोटींची कॅश अन् अर्धा किलो सोनं! लाचखोर मुद्रांक जिल्हाधिकारी चौधरींच्या घरातून कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 3, 2026
in जळगाव जिल्हा
0
दीड कोटींची कॅश अन् अर्धा किलो सोनं! लाचखोर मुद्रांक जिल्हाधिकारी चौधरींच्या घरातून कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त
बातमी शेअर करा..!

जळगाव । अकोल्याचे सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी यांच्या विरोधातील लाचखोरी प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) तपासात मोठा खुलासा झाला आहे. जळगावातील त्यांच्या विष्णुनगर येथील निवासस्थानी झालेल्या झाडाझडतीत तब्बल २ कोटी ९४ लाख ६४ हजार ८४७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, दागिने आणि मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे सापडल्याने महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

किरण चौधरी यांना २६ जून रोजी अकोला येथे १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहात अटक केली होती. या कारवाईनंतर त्यांच्याविरोधात सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपासाची व्याप्ती वाढवत एसीबीने त्यांच्या जळगावातील घराचीही तपासणी सुरू केली.

चौधरी यांचे घर सुरुवातीला पंचांसमक्ष सीलबंद करण्यात आले होते. मात्र, २८ जून रोजी पहाटे काही नातेवाईकांनी घराच्या मागील बाजूने प्रवेश करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला. एसीबी आणि स्थानिक पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधितांना ताब्यात घेतले. या घटनेप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा नोंदविण्यात आला.

झाडाझडतीत काय सापडलं?
२ जुलै रोजी चौधरी यांच्या पत्नी मनीषा चौधरी यांच्या उपस्थितीत पुन्हा घराची सखोल झाडाझडती घेण्यात आली. या कारवाईत एसीबीच्या हाती मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि मौल्यवान साहित्य लागले.

झाडाझडतीत जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये –
१ कोटी ५३ लाख ८४ हजार ६३० रुपयांची रोख रक्कम
४२२.१०० ग्रॅम सोन्याचे दागिने (किंमत ६० लाख ५७ हजार १३५ रुपये)
६२ लाख १३ हजार ३७६ रुपये किमतीची विविध मालमत्तेची कागदपत्रे
३१ हजार ४१६ रुपये किमतीचे चांदीचे दागिने
११ लाख ५२ हजार ७४५ रुपयांच्या सोने खरेदीच्या पावत्या
६ लाख २५ हजार ५४५ रुपये किमतीच्या विविध घरगुती वस्तू
असा एकूण २ कोटी ९४ लाख ६४ हजार ८४७ रुपयांचा मुद्देमाल एसीबीने जप्त केला.

एसीबी आता चौधरी यांच्या मालमत्ता, बँक व्यवहार, गुंतवणूक आणि आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करत आहे. जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांच्या आधारे बेहिशेबी संपत्तीबाबतही तपास सुरू असून, या प्रकरणात आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता तपास यंत्रणांकडून व्यक्त केली जात आहे.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या विशेष पथकाने केली.

बातमी शेअर करा..!
Previous Post

लाचखोर मुद्रांक जिल्हाधिकारी चौधरी प्रकरणाला नवे वळण; एसीबीची सीलबंद घरात गोपनीय झाडाझडती

Next Post

पुढील ७२ तास धोक्याचे! ‘या’ ६ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, जळगावलाही अलर्ट

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
राज्यात कोसळधार! आज कुठे दिला रेड अलर्ट अन् यलो अलर्ट, तुमच्या जिल्ह्यातील स्थिती पहा..

पुढील ७२ तास धोक्याचे! 'या' ६ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, जळगावलाही अलर्ट

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
राज्यात कोसळधार! आज कुठे दिला रेड अलर्ट अन् यलो अलर्ट, तुमच्या जिल्ह्यातील स्थिती पहा..

पुढील ७२ तास धोक्याचे! ‘या’ ६ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, जळगावलाही अलर्ट

July 3, 2026
दीड कोटींची कॅश अन् अर्धा किलो सोनं! लाचखोर मुद्रांक जिल्हाधिकारी चौधरींच्या घरातून कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

दीड कोटींची कॅश अन् अर्धा किलो सोनं! लाचखोर मुद्रांक जिल्हाधिकारी चौधरींच्या घरातून कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

July 3, 2026
लाचखोर मुद्रांक जिल्हाधिकारी चौधरी प्रकरणाला नवे वळण; एसीबीची सीलबंद घरात गोपनीय झाडाझडती

लाचखोर मुद्रांक जिल्हाधिकारी चौधरी प्रकरणाला नवे वळण; एसीबीची सीलबंद घरात गोपनीय झाडाझडती

July 3, 2026
मुक्ताईनगर येथील जलशुद्धीकरण केंद्र दुर्घटना: दोषींवर कठोर कारवाई होणार; राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची विधान परिषदेत घोषणा

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page