Monday, September 21, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जामनेर तहसील कार्यालयातील लाचखोरीचा पर्दाफाश; महसूल सहाय्यकासह वकील एसीबीच्या जाळ्यात

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 21, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं; न्यायपालिका क्षेत्रात खळबळ
बातमी शेअर करा..!

जळगाव : शेतात ये-जा करण्यासाठी नवीन रस्ता मंजूर करून देण्यासह प्रलंबित दाव्याचा निकाल आपल्या बाजूने लावून देण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार जामनेर तहसील कार्यालयात समोर आला आहे. तडजोडीनंतर २५ हजार रुपये स्वीकारताना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने महसूल सहाय्यकासह एका वकिलाला ताब्यात घेतले.

महसूल सहाय्यक प्रवीण सुपडू गांगुर्डे (४१) आणि वकील योगेश रामलाल वखरे (४२) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराची जामनेर शिवारातील गट क्रमांक ४०७ मध्ये शेती आहे. या शेतात जाण्या-येण्यासाठी रस्ता उपलब्ध करून मिळावा, यासाठी त्यांनी २०२२ मध्ये जामनेर तहसील कार्यालयात दावा दाखल केला होता. या प्रकरणाची तहसीलदारांसमोर सुनावणी पूर्ण झाली होती. मात्र, अंतिम निर्णयासाठी हे प्रकरण प्रलंबित होते.

निकालाबाबत माहिती घेण्यासाठी तक्रारदार आणि त्यांचे भाऊ वारंवार तहसील कार्यालयात जात होते. याचदरम्यान त्यांची महसूल सहाय्यक प्रवीण गांगुर्डे यांच्याशी भेट झाली. प्रलंबित दाव्याचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावून देण्यासाठी गांगुर्डे यांनी ३० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला.

त्यानंतर लाचेची रक्कम २५ हजार रुपयांवर निश्चित झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. याबाबत तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणी पंचांसमक्ष करण्यात आली. या प्रक्रियेदरम्यान वकील योगेश वखरे याने महसूल सहाय्यक गांगुर्डे यांच्यासाठी तक्रारदाराकडे २५ हजार रुपयांची मागणी केल्याचे एसीबीच्या कारवाईत निष्पन्न झाल्याचे सांगण्यात आले.

यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे २५ हजार रुपयांची रक्कम स्वीकारल्यानंतर पथकाने दोघांना ताब्यात घेतले. लाचेची रक्कमही जप्त करण्यात आली.या कारवाईचे पर्यवेक्षण पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांनी केले. पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे यांनी सापळा अधिकारी म्हणून कारवाईची जबाबदारी सांभाळली. पंचांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.

या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. प्रलंबित दाव्याचा निकाल, लाचेची मागणी आणि स्वीकारलेली रक्कम यासंदर्भात एसीबीकडून पुढील तपास करण्यात येत आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष मोहीम; जाणून घ्या तारीख

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं; न्यायपालिका क्षेत्रात खळबळ

जामनेर तहसील कार्यालयातील लाचखोरीचा पर्दाफाश; महसूल सहाय्यकासह वकील एसीबीच्या जाळ्यात

September 21, 2026
विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष मोहीम; जाणून घ्या तारीख

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष मोहीम; जाणून घ्या तारीख

September 21, 2026
जळगाव जिल्ह्यासाठी भाजपचे तीन जिल्हाध्यक्ष जाहीर

नंदुरबारच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ ! भाजप शहर उपाध्यक्षासह तिघांना अटक, नेमकं प्रकरण काय?

September 21, 2026
गुडन्यूज ! धनत्रयोदशीच्या दिवशी जळगावच्या सुवर्णनगरीत सोने ३००० रुपयांनी घसरले

ग्राहकांसाठी गुडन्यूज ! जळगावात सोने-चांदीच्या दरात जोरदार घसरण

September 21, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page