Monday, August 10, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

धक्कादायक ! जामनेर आगारातून मध्यरात्री एसटी बस चोरीला; पंक्चर झाल्याने पुलावरच सोडली बस

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 10, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
धक्कादायक ! जामनेर आगारातून मध्यरात्री एसटी बस चोरीला; पंक्चर झाल्याने पुलावरच सोडली बस
बातमी शेअर करा..!

जामनेर । राज्य परिवहन महामंडळाच्या जामनेर आगारातून नवी कोरी ‘जिजाऊ’ एसटी बस अज्ञात इसमाने मध्यरात्री पळवून नेल्याची धक्कादायक घटना सोमवारी उघडकीस आली. एमएच १९, एनई ४२१४ क्रमांकाची ही बस रविवारी रात्री अडीच वाजेच्या सुमारास आगारातून गायब झाली होती. मात्र, पुढील चाक पंक्चर झाल्यामुळे शहापूर गावाजवळील खडकी नदीच्या पुलावर बस सोडून चोरट्याने तेथून पोबारा केला.

ग्रामस्थांमुळे प्रकार आला समोर
सोमवारी सकाळी शहापूर येथील ग्रामस्थांना खडकी नदीवरील फरशी पुलावर बंद अवस्थेत एसटी बस उभी असल्याचे दिसून आले. या मार्गावर अचानक बस उभी असल्याने ग्रामस्थांमध्ये कुतूहल निर्माण झाले. पाहणीदरम्यान सदर बस जामनेर आगाराची असल्याचे निष्पन्न झाले. शहापूर गावात राहणाऱ्या जामनेर आगारातील चालक-वाहकांना याबद्दल माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन खात्री केली व आगार व्यवस्थापक दिनेश नाईक यांना घटनेची कल्पना दिली.

रविवारी रात्री सुमारे अडीच वाजता अज्ञात इसमाने ही बस आगारातून बाहेर काढून शहापूरच्या दिशेने पळवली. मात्र, खडकी नदीच्या पुलाजवळ पोहोचताच बसचे पुढील चाक पंक्चर झाले. पुढे गाडी चालवणे अशक्य झाल्याने संशयिताने बस पुलावरच सोडून पलायन केले. ही नवी कोरी ‘जिजाऊ’ बस जळगाव-नेरी-जामनेर मार्गावर प्रवाशांच्या सेवेत धावत होती. थेट आगारातूनच बस पळवून नेल्याने एसटी महामंडळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

आगार व्यवस्थापक दिनेश नाईक यांच्या तक्रारीवरून जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आगारातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता संशयित आरोपी कॅमेऱ्यात कैद झाल्याचे दिसून आले आहे. पोलीस आता या फुटेजच्या आधारे चोरट्याची ओळख पटवण्याचे काम करत आहेत.

सुरक्षा व्यवस्थेचा बट्ट्याबोळ; अनेक प्रश्न उपस्थित
एसटी आगारातून नवी कोरी बस थेट पळवून नेल्यामुळे जामनेर आगाराच्या सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचे स्पष्ट झाले आहे. मध्यरात्री बस बाहेर जात असताना सुरक्षा कर्मचाऱ्यांचे याकडे लक्ष कसे गेले नाही? बसच्या चाव्या चोरट्याच्या हाती कशा लागल्या? आणि बस पळवण्यामागचा नेमका हेतू काय होता? असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास जामनेर पोलीस करत आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

पदवी पास आहात? पंजाब नॅशनल बँकेत तब्बल 545 जागांसाठी भरती

Next Post

खळबळजनक ! आश्रमशाळेच्या वसतिगृहात साप शिरला; सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
खळबळजनक ! आश्रमशाळेच्या वसतिगृहात साप शिरला; सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू

खळबळजनक ! आश्रमशाळेच्या वसतिगृहात साप शिरला; सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
बिपरजॉय चक्रीवादळाचा राज्यातील या जिल्ह्याना बसणार फटका : हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

जळगावात आज सायंकाळी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

August 10, 2026
रांचीमध्ये विद्यार्थी आंदोलन चिघळले; विधानभवनाच्या मोर्चादरम्यान पोलिसांचा लाठीचार्ज

रांचीमध्ये विद्यार्थी आंदोलन चिघळले; विधानभवनाच्या मोर्चादरम्यान पोलिसांचा लाठीचार्ज

August 10, 2026
खळबळजनक ! आश्रमशाळेच्या वसतिगृहात साप शिरला; सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू

खळबळजनक ! आश्रमशाळेच्या वसतिगृहात साप शिरला; सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू

August 10, 2026
धक्कादायक ! जामनेर आगारातून मध्यरात्री एसटी बस चोरीला; पंक्चर झाल्याने पुलावरच सोडली बस

धक्कादायक ! जामनेर आगारातून मध्यरात्री एसटी बस चोरीला; पंक्चर झाल्याने पुलावरच सोडली बस

August 10, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page