जळगाव । ऑक्टोबर संपूनही थंडीने पाठ फिरवल्यामुळे जळगावकर गारव्याची आतुरतेने वाट बघत होते. महिनाभरात केवळ एकाच दिवशी रात्रीचा पारा १५ अंशांवर घसरला होता, तर इतर दिवशी तापमान १८ ते २१ अंश सेल्सिअसच्या दरम्यानच स्थिरावले होते. मात्र, आता जळगावकरांचा हा प्रतिक्षेचा काळ संपणार असून, येत्या ६ नोव्हेंबरपासून जिल्ह्यात कडक थंडीला सुरुवात होणार आहे.
हवामानातील बदलामागील नेमके कारण?
मागील काही दिवसांत बंगालच्या उपसागरात सलग दोन चक्रीवादळे आली होती. तसेच आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवरील हवामान प्रणालीमुळे जळगावातील थंडीला ब्रेक लागला होता. या प्रभावामुळे २ नोव्हेंबरपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार झाले होते. ३ तारखेला हवामान काहीसे कोरडे झाले असले, तरी ४ व ५ नोव्हेंबर रोजी अंशतः ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. मात्र, ६ नोव्हेंबरनंतर या चक्रीवादळाचा प्रभाव पूर्णपणे संपुष्टात येईल आणि हवामान पूर्णपणे कोरडे होईल. परिणामी, थेट उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांना मोकळी वाट मिळणार आहे.
थंडीचा कडाका वाढणार, पारा १३ अंशांपर्यंत खाली येणार
हवामान कोरडे झाल्यानंतर ६ नोव्हेंबरपासून शहरात थंडीचा प्रभाव हळूहळू वाढू लागेल. विशेषतः १० नोव्हेंबरनंतर थंडी अधिक तीव्र होईल आणि रात्रीचा पारा थेट १३ ते १५ अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचण्याची शक्यता आहे.















Discussion about this post