Tuesday, August 18, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावातील सराफाच्या विश्वासावर घाला! २.४५ कोटींचे सोने घेऊन पश्चिम बंगालमधील दोघे पसार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 18, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल
बातमी शेअर करा..!

जळगाव । शहरातील शनीपेठ परिसरातील सराफा व्यावसायिकाची तब्बल २ कोटी ४५ लाख ७४ हजार ७६० रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पश्चिम बंगालमधील दोघांनी व्यावसायिकाचा विश्वास संपादन करून सुमारे १.७५ किलो वजनाचे २२ कॅरेट सोन्याचे दागिने घेतले. मात्र, त्याच्या मोबदल्यात देण्याचे ठरलेले २४ कॅरेट सोन्याचे बार किंवा रोख रक्कम परत न करता दोघांनी फसवणूक केल्याचा आरोप आहे.या प्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्यवहारातून वाढवला विश्वास

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनीपेठ परिसरातील आयुष ज्वेलर्सचे व्यावसायिक नबाबकुमार गौरहारी धारा (वय ४१) यांच्याशी पश्चिम बंगालमधील विद्युत निरोध बाग (वय ३१) आणि राजू बिपीन चौधरी यांनी संपर्क साधला होता. व्यवहाराच्या माध्यमातून दोघांनी सराफा व्यावसायिकाचा विश्वास संपादन केला. त्यानंतर ऑक्टोबर २०२५ ते ३० मे २०२६ या कालावधीत त्यांनी दुकानातून विविध प्रकारचे सोन्याचे दागिने घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

१.७५ किलो सोन्याचे दागिने घेतले

आरोपींनी तब्बल १,७५५.३४० ग्रॅम म्हणजे सुमारे १.७५ किलो वजनाचे २२ कॅरेट सोन्याचे तयार दागिने घेतले. या दागिन्यांची बाजारभावानुसार किंमत तब्बल २ कोटी ४५ लाख ७४ हजार ७६० रुपये असल्याचे पोलिसांत दाखल तक्रारीत नमूद आहे.

दागिने घेतल्यानंतर आरोपींनी त्याच्या बदल्यात २४ कॅरेट शुद्ध सोन्याची लगड किंवा त्याची रोख किंमत परत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, दागिने ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी ठरल्याप्रमाणे सोन्याची लगड अथवा पैसे परत केले नाहीत.

वारंवार मागणी करूनही टाळाटाळ

दागिन्यांच्या बदल्यातील रक्कम किंवा सोन्याची लगड परत मिळावी यासाठी सराफ व्यावसायिकाने आरोपींकडे वारंवार मागणी केली. मात्र, दोघांकडून टाळाटाळ करण्यात आली. अखेर आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यावसायिकाने शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४) आणि ३१६(४) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

आरोपींचा पश्चिम बंगालमध्ये शोध

दोन्ही आरोपी पश्चिम बंगालमधील रहिवासी असल्याने पोलिसांसमोर त्यांना शोधून ताब्यात घेण्याचे आव्हान आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपींच्या ठिकाणांचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष खेडकर करीत आहेत. प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची कार्यवाही सुरू आहे. या फसवणुकीमागे आणखी कोणी सहभागी आहे का, तसेच सोन्याचे दागिने नेमके कुठे वळवण्यात आले, याचाही तपास केला जात आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

दाभोलकर हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट! सचिन अंदुरेला जामीन, जन्मठेपेलाही स्थगिती

Next Post

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमध्ये नोकरीची संधी; विविध पदांच्या ४७० पदांवर भरती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये बंपर पदावर भरती

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमध्ये नोकरीची संधी; विविध पदांच्या ४७० पदांवर भरती

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
10वी पास ते पदवीधारकांसाठी नोकरीची मोठी संधी.. विनापरीक्षा होणार निवड

जामनेर येथे २० ऑगस्टला प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी नोकरीच्या संधी

August 18, 2026
शिंदे गटाच्या नव्या कार्यकारिणीवर कपिल सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं?

धनुष्यबाण कुणाचा? सुप्रीम कोर्टातील सुनावणीत कपिल सिब्बलांचा मोठा दावा

August 18, 2026
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

दुकान बंद करून घरी जाताना व्यापाऱ्याला लुटले; मिरचीपूड डोळ्यात फेकून लाखोंची रोकड लंपास

August 18, 2026
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये बंपर पदावर भरती

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमध्ये नोकरीची संधी; विविध पदांच्या ४७० पदांवर भरती

August 18, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page