जळगाव । गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन मिरवणूक शांततेत, सुरक्षित आणि सुरळीत पार पडावी यासाठी शहर वाहतूक शाखेतर्फे वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. २५ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजेपासून ते २६ सप्टेंबर रोजी पहाटे २ वाजेपर्यंत मिरवणूक मार्गावरील सर्व वाहतूक बंद ठेवून ती पर्यायी मार्गांनी वळवण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत धिवरे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३३(१) अन्वये ही अधिसूचना जारी केली आहे.

सार्वजनिक व घरगुती गणेश मूर्तीची विसर्जन मिरवणूक कोर्ट चौक, गोविंदा रिक्षा स्टॉप, नेहरू पुतळा, गोलाणी मार्केट, नटवर टॉकीज, टॉवर चौक, प्रकाश मेडिकल, घाणेकर चौक, लालशाह बाबा दर्गा, भिलपुरा चौकी, बालाजी मंदिर, बागवान मोहल्ला, जोशी पेठ, सुभाष चौक, बेंडाळे चौक, पांडे डेअरी चौक, पंचमुखी हनुमान मंदिर, सिद्धी कॉलनी, इच्छादेवी चौक, तांबापुरा व जुना शिरसोली नाका मार्गे मेहरुण तलावाकडे जाणार आहे.

बदल अन् पर्यायी मार्ग असा
जळगाव ते पाचोरा : इच्छादेवी चौकी, डी-मार्ट, मोहाडी रोड, वाय-पॉइंट, गायत्रीनगर, गणेश घाट, सेंट टेरेसा स्कूल, हॉटेल ग्रेप्स, मलंगशाह बाबा दर्गा व शिरसोली रोडवरील वाहतूक एसटी बसेस, अवजड वाहने, इतर वाहनांसाठी विसर्जनादरम्यान बंद राहील. जळगावहून पाचोरा जाणाऱ्या बसेस, कार, दुचाकी आकाशवाणी, काव्यरत्नावली, महाबळ, गाडगेबाबा चौक, राजे संभाजी चौक, गुरू पेट्रोल पंप, मलंगशाह बाबा दर्गा मार्गे पाचोरा जातील. तर याच उलट मार्गाने
पाचोऱ्याहून जळगावकडे वाहने येतील. असोदा-भादली: येथून येणारी जाणारी वाहने मोहन टॉकीज, गजानन मालुसरे नगर, जुने जळगाव, कालिका माता मंदिर मार्गे महामार्गावरून अजिंठा चौक, आकाशवाणी चौक, नवीन बसस्थानक या मार्गाचा वापर करतील.
यावल / चोपडा : येथून ये-जा करणारी वाहने आकाशवाणी, शिव कॉलनी, खोटे नगर, निमखेडी रोड, रेल्वे गेट, शिवाजीनगर मार्गे जातील.
कानळदा, भोकर : येथून ये-जा करणारी वाहने स्वातंत्र्य चौक, रिंगरोड, गोकूळ स्वीट मार्ट, सुरेश कलेक्शन उड्डाणपूल या मार्गाचा वापर करतील.
पोलिस प्रशासनाने नागरिकांना आणि वाहनधारकांना विनंती केली आहे की, अनंत चतुर्दशीच्या दिवशी होणारी गैरसोय टाळण्यासाठी वरील पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे.















Discussion about this post