Monday, November 9, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात एफडीएची मोठी कारवाई ! लाखोंचा खाद्यसाठा जप्त

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 9, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
महागाईतून दिलासा मिळणार! खाद्यतेल आणखी स्वस्त होणार, सरकारने कंपन्यांना किंमत कमी करण्याचे निर्देश
बातमी शेअर करा..!

जळगाव : दिवाळीचा सण जवळ येताच बाजारपेठांमध्ये खाद्यपदार्थांची खरेदी-विक्री वाढली आहे. याच गर्दीच्या हंगामात ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या व्यावसायिकांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. जळगाव जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत खाद्यतेल, खवा आणि पेढ्यांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. जळगाव एमआयडीसीतील एका तेल कंपनीवर कारवाई करत ७ लाख ६५ हजार रुपये किमतीचे ४ हजार ४२५ किलो तेल सील करण्यात आले. तर धरणगावातही १७ लाखांहून अधिक किमतीचा तेलसाठा जप्त करण्यात आल्याने व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

सणासुदीच्या काळात मिठाई, खाद्यतेल, खवा आणि इतर खाद्यपदार्थांना मोठी मागणी असते. या संधीचा गैरफायदा घेत निकृष्ट दर्जाचे किंवा नियमांचे उल्लंघन करून तयार केलेले पदार्थ बाजारात विकले जाण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने जिल्हाभर तपासणी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील सात प्रमुख तेल उत्पादक कंपन्यांची अचानक तपासणी करण्यात आली.

या तपासणीत एका कंपनीत अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी ४ हजार ४२५ किलो तेलाचा साठा ताब्यात घेत सील केला. जप्त तेलाचे बाजारमूल्य ७ लाख ६५ हजार रुपये आहे. या साठ्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, प्रयोगशाळेचा अहवाल येईपर्यंत तेलाचा वापर करता येणार नाही.

पारोळा ते चोपड्यापर्यंत कारवाईचा धडाका

केवळ जळगाव शहरापुरतीच ही मोहीम मर्यादित न ठेवता जिल्ह्यातील इतर शहरांमध्येही तपासणी करण्यात आली. पारोळा येथे नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एका केटरर्सचा परवाना रद्द करण्यात आला. चाळीसगावमध्ये २४ किलो खवा जप्त करण्यात आला असून, त्याची किंमत ९ हजार १०० रुपये आहे.

धरणगावमध्ये प्रशासनाने मोठी कारवाई करत तब्बल १७ लाख २३ हजार रुपये किमतीचा ४ हजार ५०० किलो तेलसाठा जप्त केला. तर चोपडा शहरात अस्वच्छ वातावरणात तयार केले जात असलेले १६ हजार रुपये किमतीचे पेढे जप्त करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील खाद्यपदार्थ विक्रेते आणि उत्पादकांचे धाबे दणाणले आहेत.

दीनानाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम

जळगाव एमआयडीसीतील कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त दीनानाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार, किशोर साळुंखे आणि आकाश बोराडे यांच्या पथकाने ही तपासणी केली.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना शुद्ध आणि सुरक्षित खाद्यपदार्थ मिळावेत, यासाठी प्रशासनाने तपासणीचा वेग वाढविला आहे. मिठाई, खवा, खाद्यतेल खरेदी करताना ग्राहकांनीही दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. सणाच्या आनंदात भेसळयुक्त पदार्थांमुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाची ही मोहीम महत्त्वपूर्ण ठरत आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

नागपूर भूकंपाने हादरला! २.६ रिश्टर स्केल तीव्रतेच्या धक्क्यांची नोंद

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
महागाईतून दिलासा मिळणार! खाद्यतेल आणखी स्वस्त होणार, सरकारने कंपन्यांना किंमत कमी करण्याचे निर्देश

जळगाव जिल्ह्यात एफडीएची मोठी कारवाई ! लाखोंचा खाद्यसाठा जप्त

November 9, 2026
भूकंपाने महाराष्ट्रातील हे जिल्हे हादरले; नागरीक भयभीत

नागपूर भूकंपाने हादरला! २.६ रिश्टर स्केल तीव्रतेच्या धक्क्यांची नोंद

November 8, 2026
रस्ता खचला, पाहणी न करताच परतले; मंत्री महाजनांना रोहित पवारांनी सुनावलं, म्हणाले..

‘तुम्हाला लाज वाटली पाहिजे’; शेतकऱ्यांचे ५ हजार परत मागणाऱ्या गिरीश महाजनांवर रोहित पवारांचा घणाघात!

November 8, 2026
भारतीय रेल्वेत परीक्षेशिवाय नोकरीची उत्तम संधी, 10वी पास, ITI उत्तीर्णांसाठी संधी..

उत्तर रेल्वेत ४,६५१ अप्रेंटिस पदांसाठी भरती; दहावी आणि ITI उत्तीर्णांना संधी

November 8, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page