Sunday, November 8, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

‘तुम्हाला लाज वाटली पाहिजे’; शेतकऱ्यांचे ५ हजार परत मागणाऱ्या गिरीश महाजनांवर रोहित पवारांचा घणाघात!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 8, 2026
in जळगाव जिल्हा, राजकारण
0
रस्ता खचला, पाहणी न करताच परतले; मंत्री महाजनांना रोहित पवारांनी सुनावलं, म्हणाले..
बातमी शेअर करा..!

जळगाव : राज्यातील शेतकरी दुष्काळाच्या संकटाचा सामना करत असताना दिवाळीनिमित्त सरकारने त्यांच्या बँक खात्यात जमा केलेल्या पाच हजार रुपयांच्या मदतीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या शेतकऱ्यांनी गरज नसेल तर मदतीची रक्कम परत करावी, असे आवाहन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले होते. त्यांच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी तीव्र संताप व्यक्त करत महाजन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

‘पाच हजार देऊन शेतकऱ्यांची थट्टा केली’

गिरीश महाजन यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना रोहित पवार यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली. “गिरीश महाजन यांना मला सांगायचे आहे की, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. एकतर पाच हजार रुपये देऊन तुम्ही शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. त्यातही आता गरिबांच्या बाबतीत दिलेले पैसे परत मागत आहात. शेतमजुरांना तुम्ही काहीच मदत केली नाही,” असे रोहित पवार म्हणाले.

पुढे त्यांनी नाशिकमधील महाकुंभाच्या कामावरूनही महाजन यांना लक्ष्य केले. “पवित्र भूमी नाशिकमध्ये, जिथे महाकुंभ होतोय, तिथे तुम्ही हजारो कोटींचा भ्रष्टाचार करत आहात. मात्र, गरिबांच्या बाबतीत दिलेले पैसे परत मागत आहात. या सरकारमधील प्रत्येकाला लाज वाटली पाहिजे. यांना काहीच कळत नाही. अशा नेत्यांना योग्य वेळी जनताच जागा दाखवेल,” अशा शब्दांत रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला.

नेमके काय म्हणाले होते गिरीश महाजन?

राज्यातील शेतकऱ्यांना दिवाळीनिमित्त सरकारकडून पाच हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. याच मदतीबाबत बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या शेतकऱ्यांना पैसे परत करण्याचे आवाहन केले होते.

“सरकारने सर्व शेतकऱ्यांना पाच-पाच हजार रुपयांची मदत दिली आहे. मात्र, अनेक शेतकरी असे आहेत की, त्यांनी मला भेटून पाच हजार रुपये मिळाले असले तरी आम्हाला त्याची आवश्यकता नाही, असे सांगितले. आमचा जोडधंदा आहे आणि आमच्याकडे पैशांची चणचण नाही. त्यामुळे ज्यांना या पैशांची गरज नाही, अशा आर्थिकदृष्ट्या सक्षम शेतकऱ्यांनी पाच हजार रुपये परत करावेत,” असे महाजन यांनी म्हटले होते.

दरम्यान, महाजन यांच्या या विधानामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, रोहित पवार यांच्या आक्रमक प्रतिक्रियेमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

उत्तर रेल्वेत ४,६५१ अप्रेंटिस पदांसाठी भरती; दहावी आणि ITI उत्तीर्णांना संधी

Next Post

नागपूर भूकंपाने हादरला! २.६ रिश्टर स्केल तीव्रतेच्या धक्क्यांची नोंद

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भूकंपाने महाराष्ट्रातील हे जिल्हे हादरले; नागरीक भयभीत

नागपूर भूकंपाने हादरला! २.६ रिश्टर स्केल तीव्रतेच्या धक्क्यांची नोंद

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भूकंपाने महाराष्ट्रातील हे जिल्हे हादरले; नागरीक भयभीत

नागपूर भूकंपाने हादरला! २.६ रिश्टर स्केल तीव्रतेच्या धक्क्यांची नोंद

November 8, 2026
रस्ता खचला, पाहणी न करताच परतले; मंत्री महाजनांना रोहित पवारांनी सुनावलं, म्हणाले..

‘तुम्हाला लाज वाटली पाहिजे’; शेतकऱ्यांचे ५ हजार परत मागणाऱ्या गिरीश महाजनांवर रोहित पवारांचा घणाघात!

November 8, 2026
भारतीय रेल्वेत परीक्षेशिवाय नोकरीची उत्तम संधी, 10वी पास, ITI उत्तीर्णांसाठी संधी..

उत्तर रेल्वेत ४,६५१ अप्रेंटिस पदांसाठी भरती; दहावी आणि ITI उत्तीर्णांना संधी

November 8, 2026
चिमुरडीचा दिवाळीचा हट्ट अखेरचा ठरला! आजोबांसह तिघांचा अपघातात मृत्यू

चिमुरडीचा दिवाळीचा हट्ट अखेरचा ठरला! आजोबांसह तिघांचा अपघातात मृत्यू

November 8, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page