नागपूर : नागपूर जिल्ह्यात आज दुपारी सौम्य भूकंपाची नोंद झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या अधिकृत नोंदीनुसार, दुपारी २ वाजून १७ मिनिटांनी २.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपाची खोली जमिनीखाली ५ किलोमीटर इतकी नोंदवण्यात आली आहे.
राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने या भूकंपाची नोंद तपासून निश्चित केली आहे. भूकंपाची तीव्रता कमी असल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
दरम्यान, भूकंपाचे धक्के नागपूर जिल्ह्यातील नेमक्या कोणत्या भागात जाणवले, तसेच नागरिकांना या धक्क्यांची जाणीव झाली का, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. मात्र, जिल्ह्यात भूकंपाची नोंद झाल्याने नागरिकांमध्ये याबाबत चर्चा सुरू झाली आहे.














Discussion about this post