Saturday, October 17, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

कारमध्ये अवैध गुटख्याची वाहतूक ; सावदा पोलिसांनी पकडला १०.२७ लाखांचा मुद्देमाल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 28, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल
बातमी शेअर करा..!

जळगाव । महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची चोरटी वाहतूक करणाऱ्यांविरोधात सावदा पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. तांदलवाडी फाट्याजवळ संशयित होंडा अमेझ कार पकडून त्यातून ५ लाख २७ हजार ७०० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला साठा जप्त करण्यात आला. या मालाच्या वाहतुकीसाठी वापरलेली सुमारे ५ लाख रुपये किमतीची कारही पोलिसांनी ताब्यात घेतली. एकूण १० लाख २७ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांना २७ ऑगस्ट रोजी रात्री प्रतिबंधित गुटख्याची कारमधून वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार तांदलवाडी फाट्याजवळ सापळा रचण्यात आला. रात्री ११ वाजून ४ मिनिटांनी संशयित कार (एमएच-१९-सीव्ही-४४४५) तेथे येताच पोलिसांनी ती थांबवली.

कारची पंचांसमक्ष झडती घेतली असता विमल पानमसाला, केशरयुक्त पानमसाला आणि सुगंधित तंबाखूची पाकिटे मोठ्या प्रमाणात आढळून आली. याप्रकरणी कारचालक सारंग मुरलीधर अवचार (३१, रा. अकलूद, ता. यावल) याला अटक करण्यात आली.

बुऱ्हाणपूरमधून माल आणल्याचा दावा

प्राथमिक चौकशीत आरोपीने हा प्रतिबंधित माल मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूर येथून आणल्याचे सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. भुसावळ आणि वरणगाव परिसरात या मालाची विक्री करण्याचा त्याचा उद्देश होता का, तसेच या साखळीमध्ये आणखी कोण सहभागी आहे, याचा तपास सुरू आहे.

या कारवाईत प्रतिबंधित मालासह वाहन जप्त करण्यात आले असून, सावदा पोलीस ठाण्यात संबंधित कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप करीत आहेत. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सावदा पोलिसांनी ही कारवाई केली.

बातमी शेअर करा..!
Previous Post

मक्याच्या शेताआड गांजाची शेती; पोलिसांचा छापा, ९३.५० लाखांचा गांजा जप्त

Next Post

शेवटची राखी बांधून घेतली अन् ‘मी जातोय’चा मेसेज केला; जळगावात १७ वर्षीय तरुणाची आत्महत्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
शेवटची राखी बांधून घेतली अन् ‘मी जातोय’चा मेसेज केला; जळगावात १७ वर्षीय तरुणाची आत्महत्या

शेवटची राखी बांधून घेतली अन् ‘मी जातोय’चा मेसेज केला; जळगावात १७ वर्षीय तरुणाची आत्महत्या

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
नशिराबादमध्ये उघड्या तलवारीने दहशत माजवणाऱ्या तरुण जेरबंद

नशिराबादमध्ये उघड्या तलवारीने दहशत माजवणाऱ्या तरुण जेरबंद

October 17, 2026
शिंदे गटातील ‘या’ पाच मंत्र्यांना ‘नारळ’ देण्याचे भाजप हायकमांडचे आदेश

एकनाथ शिंदे ‘भाकरी फिरवणार’? मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलांची चर्चा; तरुण आमदारांना मिळणार संधी?

October 17, 2026
जळगावकरांनो, पाणी जपून वापरा! आजपासून १० टक्के पाणीकपात; वाहन धुणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई

जळगावकरांनो, पाणी जपून वापरा! आजपासून १० टक्के पाणीकपात; वाहन धुणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई

October 17, 2026
लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं; न्यायपालिका क्षेत्रात खळबळ

भुसावळमध्ये एक हजारांची लाच घेताना दोघे एसीबीच्या जाळ्यात; भूमी अभिलेख कार्यालयात खळबळ!

October 16, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page