Saturday, August 1, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव बायपासवरील पुलाचे पिलर खचले; वर्षभरातच उघड झाला कोट्यवधींच्या कामाचा दर्जा, वाहतूक बंद

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 1, 2026
in जळगाव जिल्हा
0
जळगाव बायपासवरील पुलाचे पिलर खचले; वर्षभरातच उघड झाला कोट्यवधींच्या कामाचा दर्जा, वाहतूक बंद
बातमी शेअर करा..!

जळगाव | जळगाव शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी आणि अपघातांचे प्रमाण घटविण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेल्या तरसोद–पाळधी बायपास महामार्गावरील पुलाचे पिलर खचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या वर्षभरापूर्वी वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेल्या या बायपासवरील पुलाच्या संरचनेला तडे गेल्याने सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासनाने या मार्गावरील वाहतूक तातडीने बंद केली आहे.

मुंबई–नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ ला जोडणाऱ्या या बायपासचे बांधकाम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) मार्फत करण्यात आले होते. मात्र, नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसानंतर पुलाच्या पिलरभोवतीची माती वाहून गेली असून काही भाग उघडा पडल्याचे दिसून आले आहे. तसेच रस्त्यालाही मोठ्या भेगा पडल्यामुळे पुलाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून तरसोद ते पाळधी या बायपासवरील दोन्ही बाजूंची वाहतूक बंद करण्यात आली आहे. पाळधी गावाजवळ बॅरिकेड्स, सूचना फलक आणि मुरूम टाकून मार्ग बंद करण्यात आला असून सर्व वाहतूक जळगाव शहरातील मुख्य मार्गावरून वळविण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील वाहतुकीवर पुन्हा एकदा ताण वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दरम्यान, घटनास्थळी कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून रुग्णवाहिकाही सज्ज ठेवण्यात आली आहे. पुलाच्या स्थितीचा तांत्रिक आढावा घेण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून पाहणी करण्यात येत असून दुरुस्तीबाबत पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

या प्रकाराबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांच्याकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकली नाही. त्यामुळे या घटनेमागील नेमके कारण आणि कामाच्या गुणवत्तेबाबत विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

दरम्यान, अवघ्या वर्षभरातच पुलाच्या संरचनेत बिघाड झाल्याने नागरिकांकडून या कामाच्या गुणवत्तेची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. तांत्रिक तपासणीनंतरच या घटनेचे नेमके कारण स्पष्ट होणार असले, तरी सार्वजनिक निधीतून उभारण्यात आलेल्या महत्त्वाच्या प्रकल्पाच्या टिकाऊपणाबाबत गंभीर चर्चा सुरू झाली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

आजही पावसाचा हाहाकार, राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

Next Post

हतनूरचा विसर्ग वाढला; धरणातून 1.81 लाख क्यूसेक विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
हतनूर धरणाचे 20 गेट उघडले ; नदी काठच्या गावांना सतर्कता बाळगण्याचे निर्देश

हतनूरचा विसर्ग वाढला; धरणातून 1.81 लाख क्यूसेक विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
तरुणांसाठी आनंदाची बातमी! भारत सरकारच्या या कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी

SPMCIL मध्ये विविध पदांसाठी भरती; २४ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्जाची संधी

August 1, 2026
१८, १९ नोव्हेंबरला शाळा सुरु राहणार की बंद? शिक्षण आयुक्तांचे दिले स्पष्टीकरण, वाचा काय आहे?

विद्यार्थ्यांची मज्जा! ऑगस्टमध्ये शाळांना सुट्ट्याच सुट्ट्या; वाचा सुट्ट्यांची यादी

August 1, 2026
आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी

आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी

August 1, 2026
परीक्षा सुधारणा विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी; काय आहे शिक्षेची तरतूद?

परीक्षा सुधारणा विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी; काय आहे शिक्षेची तरतूद?

August 1, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page