भारतीय रेल्वेत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. रेल्वे विभागात विविध वैद्यकीय आणि पॅरामेडिकल पदांसाठी तब्बल ५६० जागांवर भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये नर्सिंग सुपरिटेंडेंट, डायलिसिस टेक्निशियन, हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर, फार्मासिस्ट, रेडिओग्राफर, ECG टेक्निशियन आणि लॅब असिस्टंट अशा पदांचा समावेश आहे.


या भरतीसाठी पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करता येणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोणत्या पदांसाठी भरती?
या भरतीअंतर्गत नर्सिंग सुपरिटेंडेंट, डायलिसिस टेक्निशियन, हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर ग्रेड-२, फार्मासिस्ट, रेडिओग्राफर/एक्स-रे टेक्निशियन, ECG टेक्निशियन आणि लॅब असिस्टंट ग्रेड-२ या पदांवर नियुक्ती केली जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता काय?
नर्सिंग सुपरिटेंडेंट पदासाठी GNM किंवा B.Sc. नर्सिंग आवश्यक आहे. डायलिसिस टेक्निशियन पदासाठी B.Sc. तसेच हेमोडायलिसिसमधील डिप्लोमा किंवा संबंधित दोन वर्षांचा अनुभव अपेक्षित आहे.
हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर पदासाठी B.Sc. (Chemistry) तसेच हेल्थ/सॅनिटरी इन्स्पेक्टर डिप्लोमा किंवा NTC पात्रता आवश्यक आहे.
फार्मासिस्ट पदासाठी १२वी उत्तीर्ण आणि D.Pharm आवश्यक आहे. रेडिओग्राफर/एक्स-रे टेक्निशियन पदासाठी १२वीसोबत संबंधित रेडिओग्राफी किंवा एक्स-रे टेक्निशियनचा डिप्लोमा आवश्यक आहे.
ECG टेक्निशियन पदासाठी १२वी किंवा B.Sc. तसेच ECG/लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी, कार्डिओलॉजी किंवा संबंधित अभ्यासक्रमातील डिप्लोमा/पदवी आवश्यक आहे. लॅब असिस्टंट ग्रेड-२ पदासाठी १२वी उत्तीर्ण आणि DMLT ही पात्रता आहे.
वयोमर्यादा पदानुसार वेगळी
उमेदवारांचे वय १ जानेवारी २०२७ रोजी विचारात घेतले जाणार आहे. नर्सिंग सुपरिटेंडेंट पदासाठी वयोमर्यादा २० ते ४० वर्षे, डायलिसिस टेक्निशियनसाठी २० ते ३३ वर्षे आहे.
हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर, ECG टेक्निशियन आणि लॅब असिस्टंटसाठी १८ ते ३३ वर्षे, फार्मासिस्टसाठी २० ते ३५ वर्षे, तर रेडिओग्राफर पदासाठी १९ ते ३३ वर्षे वयोमर्यादा आहे. SC/ST उमेदवारांना ५ वर्षे, तर OBC उमेदवारांना ३ वर्षांची वयोमर्यादा सवलत देण्यात येणार आहे.
अर्ज शुल्क किती?
सर्वसाधारण, OBC आणि EWS उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ५०० रुपये आहे. तर SC, ST, माजी सैनिक, ट्रान्सजेंडर, EBC आणि महिला उमेदवारांसाठी २५० रुपये शुल्क आहे.
संपूर्ण भारतात नोकरीची संधी
या भरतीतील नियुक्ती संपूर्ण भारतात होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत भरती जाहिरातीत दिलेल्या अटी व पात्रता तपासून ऑनलाइन अर्ज करावा.
ऑनलाइन अर्जाची अंतिम मुदत : १४ ऑक्टोबर २०२६, रात्री ११.५९ वाजेपर्यंत.















Discussion about this post