बँकिंग क्षेत्रात नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इंडियन ओव्हरसीज बँकेने २९१ जनरलिस्ट आणि स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर २०२६ आहे.
२९१ पदांवर होणार भरती
इंडियन ओव्हरसीज बँकेच्या या भरतीमध्ये जनरलिस्ट/स्पेशलिस्ट ऑफिसर या पदांचा समावेश आहे. पदानुसार शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाची अट वेगवेगळी आहे.
शैक्षणिक पात्रता काय?
तांत्रिक स्वरूपाच्या पदांसाठी MCA, M.Sc. (Computer Science/IT), B.E. किंवा B.Tech. (Computer Science, IT, Electronics & Communication, Electronics & Instrumentation, Cyber Security किंवा Information Security) यापैकी संबंधित पात्रता आवश्यक आहे. तर काही पदांसाठी कोणत्याही शाखेतील पदवीसोबत MBA (Finance), PGDM (Finance), PGDBF, MFM, MFC, CA किंवा CMA यापैकी पात्रता असणे आवश्यक आहे. उमेदवारांना पदानुसार २ ते ८ वर्षांचा संबंधित कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा किती?
१ ऑगस्ट २०२६ रोजी उमेदवाराचे वय पदानुसार ३२, ३३, ३५, ३८ किंवा ४५ वर्षांपर्यंत असावे. अनुसूचित जाती आणि जमातीच्या उमेदवारांना ५ वर्षे, तर इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांना ३ वर्षांची वयोमर्यादा शिथिलता देण्यात आली आहे.
संपूर्ण भारतात नोकरीची संधी
या भरतीतील निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतात नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे विविध राज्यांतील पात्र उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
अर्ज शुल्क किती?
सामान्य, OBC आणि EWS प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क १,००० रुपये आहे. तर SC, ST आणि PWD प्रवर्गातील उमेदवारांसाठी १७५ रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.
१५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करा
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे. पात्र उमेदवारांनी १५ सप्टेंबर २०२६ ही अंतिम तारीख लक्षात घेऊन वेळेत अर्ज करावा. बँकिंग क्षेत्रात अधिकारी पदावर करिअर करण्याची इच्छा असलेल्या अनुभवी उमेदवारांसाठी ही भरती महत्त्वाची संधी ठरू शकते.














Discussion about this post