Monday, August 31, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावातील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; सख्खे भाऊ जेरबंद, सर्व मुद्देमाल जप्त

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 31, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
जळगावातील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; सख्खे भाऊ जेरबंद, सर्व मुद्देमाल जप्त
बातमी शेअर करा..!

जळगाव । एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामेश्वर कॉलनीत झालेल्या तब्बल ३१ लाख २६ हजार ८०० रुपयांच्या घरफोडीचा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावला. सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन सख्ख्या भावांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेले २०८ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि २८ ग्रॅम चांदी असा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. विशाल मुरलीधर दाभाडे आणि जितेंद्र मुरलीधर दाभाडे, दोघेही रा. रामेश्वर कॉलनी, अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

दर्शनासाठी गेले अन् घर फोडले

रामेश्वर कॉलनीतील रहिवासी संगीता घुगे या कुटुंबीयांसह मध्य प्रदेशातील उज्जैन येथे दर्शनासाठी गेल्या होत्या. याच संधीचा फायदा घेत २७ ते २८ ऑगस्टच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले.घुगे कुटुंबीय दर्शनाहून परतल्यानंतर घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सीसीटीव्हीने दिला धागा

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला वेग देण्यात आला. पीएसआय चंद्रकांत धनके यांच्या पथकाने घटनास्थळासह परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले तसेच गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढला.तपासादरम्यान विशाल दाभाडे आणि जितेंद्र दाभाडे या दोघांवर संशय बळावला. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर त्यांच्या ताब्यातून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

सोन्याचे दागिने अन् चांदीचे जोडवे जप्त

पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालात सोन्याचे गंठन, पाटल्या, विविध डिझाईनच्या अंगठ्या, टॉप्स, नथ तसेच चांदीचे जोडवे यांचा समावेश आहे. एकूण २०८ ग्रॅम सोने आणि २८ ग्रॅम चांदी असा ३१ लाख २६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला आहे.अवघ्या २४ तासांत गुन्ह्याचा छडा लावत चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केल्याने एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

इंडियन ओव्हरसीज बँकेत २९१ पदांसाठी भरती; पात्रता काय? तपासून घ्या

Next Post

व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्राच्या त्रुटींची पूर्तता करण्याचे आवाहन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
या मोहीमेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात 7 हजार 859 विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्रांचे वाटप

व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्राच्या त्रुटींची पूर्तता करण्याचे आवाहन

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
या मोहीमेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात 7 हजार 859 विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्रांचे वाटप

व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्राच्या त्रुटींची पूर्तता करण्याचे आवाहन

August 31, 2026
जळगावातील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; सख्खे भाऊ जेरबंद, सर्व मुद्देमाल जप्त

जळगावातील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; सख्खे भाऊ जेरबंद, सर्व मुद्देमाल जप्त

August 31, 2026
बँकेत नोकरीची संधी! ४०० पदांसाठी सुरूय भरती, आजच अर्ज करा

इंडियन ओव्हरसीज बँकेत २९१ पदांसाठी भरती; पात्रता काय? तपासून घ्या

August 31, 2026

सुप्रीम कोर्टाचा कॉक्रोच जनता पार्टी’च्या आंदोलानावर मोठा निर्णय; थेट केंद्र सरकार, दिल्ली पोलिसांना धाडली नोटिस

August 31, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page