जळगाव । आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा परिणाम सोने आणि चांदीच्या दरांवर होत असून, जळगावच्या सराफ बाजारात आज मौल्यवान धातूंच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात तब्बल २ हजार ५०० रुपयांची, तर चांदीच्या दरात ४ हजार रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे सोने-चांदी खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

जळगाव सराफ बाजारात गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील बदल, डॉलरची स्थिती आणि इतर आर्थिक घडामोडींचा परिणाम मौल्यवान धातूंच्या दरावर होत आहे. त्यातच आज दोन्ही धातूंच्या दरात लक्षणीय घसरण नोंदवण्यात आली.

सोन्याच्या दरात मोठी घसरण
जळगाव सराफ बाजारात आज १० ग्रॅम सोन्याच्या दरात २ हजार ५०० रुपयांची घसरण झाली आहे. या घसरणीनंतर जीएसटीसह १० ग्रॅम सोन्याचा दर १ लाख ५३ हजार ४७० रुपये इतका झाला आहे.
चांदीही झाली स्वस्त
सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही मोठी घट झाली आहे. एक किलो चांदीच्या दरात तब्बल ४ हजार रुपयांची घसरण झाली असून, आजचा जीएसटीसह चांदीचा दर २ लाख ३४ हजार ८४० रुपये प्रति किलो इतका झाला आहे.
गेल्या काही दिवसांतील दरांच्या तुलनेत आजची घसरण लक्षणीय असल्याने सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे लक्ष आता बाजारातील पुढील दरवाढ-घसरणीकडे लागले आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींनुसार या दरांमध्ये पुन्हा बदल होण्याची शक्यता असते.















Discussion about this post