Sunday, July 26, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

‘ऑपरेशन ब्लू स्टारवरून’ राजकारण तापलं, शरद पवारांनी गिरीश महाजनांना सुनावले तर फडणवीस म्हणाले…;

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 10, 2026
in Uncategorized
0
‘ऑपरेशन ब्लू स्टारवरून’ राजकारण तापलं, शरद पवारांनी गिरीश महाजनांना सुनावले तर फडणवीस म्हणाले…;
बातमी शेअर करा..!

मुंबई । राज्याचे जलसंपदामंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांनी १९८४ मधील ‘ऑपरेशन ब्लू स्टार’बाबत अमृतसर येथील एका कार्यक्रमात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. महाजन यांच्या विधानावरून महाविकास आघाडीने भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला असून, दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनांची खंबीर पाठराखण केली आहे. या प्रकरणामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध पेटले आहे.

गिरीश महाजन नेमके काय म्हणाले होते?
दमदमी टकसालच्या एका कार्यक्रमात बोलताना गिरीश महाजन यांनी अमृतसरच्या सुवर्णमंदिरात शीख अतिरेक्यांविरुद्ध झालेल्या लष्करी कारवाईचा उल्लेख ‘काळा दिवस’ असा केला होता. “या कारवाईत अनेक शीख बांधव शहीद झाले,” असे म्हणत त्यांनी या घटनेची तुलना थेट अफगाण आक्रमक अहमदशहा अब्दालीच्या हल्ल्याशी केली आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर तीव्र शब्दांत टीकास्त्र सोडले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या वादाच्या पार्श्वभूमीवर इतिहासाचा संदर्भ देत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या योगदानाचा उल्लेख केला. ते म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात नेहरू यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून त्यांनी अनेक वर्षे तुरुंगवास भोगला आणि इंग्रजांविरुद्ध संघर्ष केला.गांधींच्या नेतृत्वाखाली शेवटी तुम्हाला मला स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून ओळख झाली. यामध्ये नेहरूंची कामगिरी मोठी होती. ती विसरता येणार नाही असे शरद पवार यांनी सुनावले.

“हा देशद्रोहाचा प्रकार, महाजनांची हकालपट्टी करा!” – संजय राऊत आक्रमक

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गिरीश महाजन यांच्या वक्तव्यावर तीव्र संताप व्यक्त करत त्यांच्यावर देशद्रोहाचा शिक्का मारला. राऊत म्हणाले,”देशाची अखंडता, एकता आणि सुरक्षेसाठी करण्यात आलेल्या लष्करी कारवाईला ‘काळा दिवस’ म्हणणे म्हणजे देशद्रोहासारखे आहे. ही कारवाई देशाच्या हितासाठी होती आणि या मोहिमेचे नेतृत्व करणारे माजी लष्करप्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य यांनी देशासाठी आपले बलिदान दिले आहे. त्यामुळे अशा बेजबाबदार मंत्र्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी.” अशी मागणी केली

दरम्यान, एकीकडे विरोधकांकडून होणाऱ्या चौफेर हल्ल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत गिरीश महाजन यांची जोरदार पाठराखण केली. मुख्यमंत्री म्हणाले, “गिरीश महाजन यांनी कोणतेही चुकीचे विधान केलेले नाही. त्यांनी आपल्या भाषणातून शीख समाजाचा गौरव केला असून त्यांचे संपूर्ण भाषण हे समाजाप्रती आदराचे होते. नेहरू आणि मोदी यांच्या तुलनेचा इथे विषयच नाही, कारण दोघांचेही कार्य देशाला ठाऊक आहे. मात्र, काँग्रेसनं १९८४ मध्ये शीख समाजावर केलेला अत्याचार हा विसरता येणारा नाही. काँग्रेसच्या त्या कृत्याचा आम्ही जन्मभर निषेध करतच राहू.”

बातमी शेअर करा..!
Previous Post

महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पुर्व परिक्षा-2026; जळगाव शहरात कलम 163 लागू

Next Post

जामनेरमध्ये तरुण शेतकऱ्याचे अद्वितीय धाडस; बिबट्याशी झुंज देत जिवंत पकडून दिले वनविभागाच्या ताब्यात

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जामनेरमध्ये तरुण शेतकऱ्याचे अद्वितीय धाडस; बिबट्याशी झुंज देत जिवंत पकडून दिले वनविभागाच्या ताब्यात

जामनेरमध्ये तरुण शेतकऱ्याचे अद्वितीय धाडस; बिबट्याशी झुंज देत जिवंत पकडून दिले वनविभागाच्या ताब्यात

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
ठाकरे बंधूंच्या ‘तिरंगा मोर्चा’ला जनसमुद्राचा प्रतिसाद; आता ‘इथेनॉल मिश्रित पेट्रोल’विरोधात एल्गार

ठाकरे बंधूंच्या ‘तिरंगा मोर्चा’ला जनसमुद्राचा प्रतिसाद; आता ‘इथेनॉल मिश्रित पेट्रोल’विरोधात एल्गार

July 26, 2026
ऐतिहासिक यशानंतर CJP आता पुढे काय करणार? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन

ऐतिहासिक यशानंतर CJP आता पुढे काय करणार? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन

July 26, 2026
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर शिवाजी पार्कात ठाकरे बंधूंचा जल्लोष; उद्धव ठाकरेंचा भाजपवर थेट हल्लाबोल

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर शिवाजी पार्कात ठाकरे बंधूंचा जल्लोष; उद्धव ठाकरेंचा भाजपवर थेट हल्लाबोल

July 26, 2026
जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान अभिजीत दीपकेंची प्रकृती खालावली; ‘मला माफ करा’, म्हणत आंदोलनस्थळ सोडले

दिल्लीतील जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे; ‘सीजेपी’ने केली अधिकृत घोषणा!

July 25, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page