Monday, July 13, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

हृदयद्रावक दुर्घटना; विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 8, 2026
in क्राईम, महाराष्ट्र
0
हृदयद्रावक दुर्घटना; विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू
बातमी शेअर करा..!

सातारा | सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात बुधवारी पहाटे अत्यंत दुर्दैवी घटना घडली. घरासमोरील विद्युत केबलमध्ये उतरलेल्या विजेच्या प्रवाहाचा धक्का लागून एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात ही दुर्घटना घडल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

ही घटना फलटण तालुक्यातील खामगाव येथे खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेजवळ घडली. मृतांमध्ये पिसुरड्या किसन शिंदे (वय ४८), गंगुबाई पिसुरड्या शिंदे (वय ४६), सचिन पिसुरड्या शिंदे (वय २६) आणि आरती पिसुरड्या शिंदे (वय २२) यांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास शिंदे कुटुंबातील सदस्य घराबाहेर आले होते. त्याचवेळी घरासमोरील विद्युत केबलमध्ये अचानक विद्युत प्रवाह उतरल्याने पिसुरड्या किसन शिंदे यांना जोरदार विजेचा धक्का बसला. त्यांना वाचविण्यासाठी कुटुंबातील गंगुबाई, सचिन आणि आरती हे तातडीने धावले.

मात्र, विद्युत प्रवाहाची तीव्रता इतकी जास्त होती की, एकामागून एक तिघेही त्या प्रवाहाच्या संपर्कात आले. काही क्षणांतच चौघांचाही जागीच मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी फलटण उपजिल्हा रुग्णालयात पाठवले आहेत.

दरम्यान, विद्युत केबलमध्ये अचानक प्रवाह कसा उतरला, या दुर्घटनेमागील नेमके कारण काय, याचा सखोल तपास पोलीस आणि संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण सातारा जिल्हा हादरला असून नागरिकांकडून शिंदे कुटुंबीयांप्रती हळहळ व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

राज्यात पावसाचा धुमाकूळ कायम; या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, जळगावातही मुसळधार पावसाची शक्यता

Next Post

एकनाथ खडसेंची भाजपमध्ये घरवापसी? विनोद तावडेंच्या ‘त्या’ भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
एकनाथ खडसेंची भाजपमध्ये घरवापसी? विनोद तावडेंच्या ‘त्या’ भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ!

एकनाथ खडसेंची भाजपमध्ये घरवापसी? विनोद तावडेंच्या 'त्या' भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ!

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
१०वी, १२ वी, ग्रॅज्युएट/ITI पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ; जळगावात रोजगार मेळाव्याचे आयोजन

जळगाव जिल्ह्यात १५ जुलै रोजी रोजगार मेळावा; इलेक्ट्रिकल क्षेत्रातील २०७ हून अधिक रिक्त पदांसाठी संधी

July 13, 2026
शासकीय कर्मचा-यांसाठी खुशखबर! ७व्या वेतन आयोगाच्या चौथ्या हप्त्याची थकबाकी खात्यात जमा होणार

इतर मागासवर्गीयांच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध कर्ज योजना

July 13, 2026
शरद पवारांना ‘पहाटेच्या शपथविधी’ची कल्पना होती? अजितदादांच्या आमदाराच्या गौप्यस्फोटने राजकीय वर्तुळात खळबळ

शरद पवारांना ‘पहाटेच्या शपथविधी’ची कल्पना होती? अजितदादांच्या आमदाराच्या गौप्यस्फोटने राजकीय वर्तुळात खळबळ

July 13, 2026
कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजीत दीपकेंच्या आंदोलनाला उद्धव ठाकरेंचा जाहीर पाठिंबा

कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजीत दीपकेंच्या आंदोलनाला उद्धव ठाकरेंचा जाहीर पाठिंबा

July 13, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page