सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे. एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल (EMRS) ने विविध पदांच्या एकूण ७,२६७ रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. विशेष दहावी किंवा पदव्युत्तर पदवी असलेल्या तरुणांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची ही एक उत्तम संधी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता या भरतीसाठी अर्ज करावा. 28 ऑक्टोबर2025 ही या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
भरल्या जाणार पदाचे नाव :
1) प्राचार्य 225
2) पदव्युत्तर शिक्षक (PGT) 1460
3) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) 3962
4) महिला स्टाफ नर्स 550
5) हॉस्टेल वॉर्डन 635
6) अकाउंटंट 61
7) ज्युनियर सेक्रेटेरियल असिस्टंट (JSA) 228
8) लॅब अटेंडंट 146
भरतीसाठी पात्रता :
पद क्र.1: (i) पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed/M.Ed (iii) 09/12 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) पदव्युत्तर पदवी/M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स) /IT/MCA/M.E./M.Tech. (कॉम्प्युटर सायन्स/IT) (ii) B.Ed
पद क्र.3: (i) संबंधित पदवी (ii) B.Ed
पद क्र.4: BSc (Nursing) (ii) 2.5 वर्षे अनुभव
पद क्र.5: पदवीधर किंवा NCERT किंवा इतर NCTE मान्यताप्राप्त संस्थेच्या रीजनल कॉलेज ऑफ एज्युकेशनचा चार वर्षांचा एकात्मिक पदवी अभ्यासक्रम.
पद क्र.6: B.Com
पद क्र.7: (i) 12वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
पद क्र.8: 10वी उत्तीर्ण + लॅबोरटरी टेक्निक डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 12वी (विज्ञान) उत्तीर्ण
| जाहिरात (PDF) | Click Here |
| Online अर्ज | Apply Online |
वयाची अट काय?
१ ऑगस्ट २०२५ रोजी या पदांसाठी किमान वय ३० वर्षे आणि कमाल वय ५० वर्षे आहे. उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी अधिकृत सूचना वाचण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
अर्ज कसा करायचा?
प्रथम, nests.tribal.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
मुख्यपृष्ठावर, ‘EMRS भरती २०२५’ लिंकवर क्लिक करा.
एक-वेळ नोंदणी पूर्ण करण्यासाठी आवश्यक तपशील प्रविष्ट करा.
जनरेट केलेल्या क्रेडेन्शियल्सचा वापर करून लॉग इन करा.
अर्ज फॉर्म भरा आणि संबंधित कागदपत्रे अपलोड करा.
शुल्क भरा आणि फॉर्मचे पूर्वावलोकन केल्यानंतर तो सबमिट करा.
भविष्यातील संदर्भासाठी पुष्टीकरण पृष्ठ डाउनलोड करा आणि प्रिंट करा.















Discussion about this post