जळगाव : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त कृषी उत्पन्न बाजार समिती, जळगाव येथे हमाल-मापाडी, महिला कामगार तसेच शिलाई कामगारांना रुमालांचे वाटप करण्यात आले. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर कामगारांना उन्हापासून संरक्षण मिळावे या उद्देशाने भाजपा व्यापारी आघाडीतर्फे हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाला कामगार व व्यापारी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमात शहराचे आमदार राजू मामा भोळे यांच्या हस्ते सुमारे २५० पुरुष व महिला कामगारांना रुमालांचे वितरण करण्यात आले.
यावेळी महानगरपालिका स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, गटनेते प्रकाश बालाणी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक राठी, भाजपा व्यापारी आघाडीचे विनय बाहेती यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच हमाल कामगार अध्यक्ष इंद्रराज सपकाळे, कॉमेश सपकाळे, शरद मामा चौधरी, नगरसेवक विरण खडके, विजय वानखेडे, विनोद मराठे, मिलिंद चौधरी, प्रकाश डोडिया, विष्णुकांत मणियार, दीपक महाजन, सुनील तापडिया, मांगीलाल जैन, मुकेश कुकरेजा, कीर्तन सेजपारा, अभिलाष राठी, दर्पण पाटील, यश राठी, संजय शहा, रवींद्र फालक, प्रकाश बिर्ला, महेश पुरोहित, योगेश धूत, किरण कुलकर्णी, आकाश मंडोरा, सतनाम बावरी, संदीप दहाड, मयूर जाखेटे आदींसह कार्यकर्ते, पदाधिकारी व व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.















Discussion about this post