तुम्ही पदवीधर आहात आणि केंद्र सरकारच्या मंत्रालयात काम करण्याचा अनुभव घेऊ इच्छिता? तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) ‘डिजिटल इंडिया’ मोहिमेअंतर्गत दोन महिन्यांच्या विशेष इंटर्नशिप प्रोग्रामसाठी अर्ज मागवले आहेत. या इंटर्नशिपसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा मानधनही दिले जाणार आहे.
तुम्ही intern.meity.gov.in वर जाऊन अर्ज करु शकतात. त्यामुळे तुम्हाला मंत्रालयात काम करण्याची संधी मिळणार आहे. ही इंटर्नशिप पेड असणार आहे. डिजिटल इंडियामधील ही इंटर्नशिप कंटेट रायटिंगपासून ते व्हिडिओ एडिटिंग, वेब, डिजिटल आणि सायबर सिक्युरिटीपर्यंत ३३ क्षेत्रांमध्ये काम करण्याची संधी आहे.
एकूण ५१ पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या इंटर्नशिसाठी अर्जप्रक्रिया १० एप्रिल २०२६ पासून सुरु होणार आहे. या इंटर्नशिपसाठी अर्ज करण्याची शेवटची संधी २९ एप्रिल आहे. याचा निकाल १९ मे रोजी लागणार आहे. त्यानंतर १ जूनपासून ते ३१ जुलैपर्यंत इंटर्नशिप होणार आहे.
शैक्षणिक पात्रता
डिजिटल इंडियामधील इंटर्नशिपसाठी अर्ज करणाऱ्या उमेदावारांनी पदवी प्राप्त केलेली असावी.बी.ई /बी.टेक/एम.ई/एम.टेक/एम.एस्सी (संगणक विज्ञान/माहिती तंत्रज्ञान/इलेक्ट्रॉनिक्स/कम्युनिकेशन)किंवा एमसीए/ डीओईएसीसी बी लेव्हल कोर्स केलेला असावा. इंटरनेट पब्लिक पॉलिसी किंवा ऑनलाइन गेमिंग पॉलिसी फील्डमध्ये एलएलबी केलेले असावे. डिजिटल इकोनॉमीमध्ये इकोनॉमिक्स आणि स्टॅस्टिस्टिक्समध्ये बॅचलर डिग्री प्राप्त केलेली असावी.
स्टायपेंड
सरकारी विभागातील इंटर्नशिप नवी दिल्लीत असणार आहे. या इंटर्नशिपसाठी उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग आणि इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे.यानंतर लिस्ट डिजिटल इंडिया वेब पोर्टलवर अपलोड केली जाणार आहे. या इंटर्नशिपसाठी महिन्याला १०,००० रुपये स्टायपेंड म्हणजे दोन महिन्यासाठी २०,००० रुपये मिळणार आहेत.















Discussion about this post