नवी दिल्ली । यो यो हनी सिंग या नावाने प्रसिद्ध असलेला प्रसिद्ध बॉलिवूड आणि पंजाबी गायक हिरदेश सिंग उर्फ हनी सिंग आणि त्याची पत्नी यांच्यात झालेल्या कराराच्या आधारे न्यायालयाने घटस्फोट मंजूर केला. लग्नाच्या 12 वर्षांनंतर हा घटस्फोट झाला आहे. पत्नी शालिनी तलवारने त्याच्यावर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते.
हनी आणि शालिनी यांच्यात गेल्या अडीच वर्षांपासून घटस्फोटाचा खटला सुरू होता. अखेर लग्नाच्या 12 वर्षांनंतर ते विभक्त झाले आहेत. हनी सिंह आणि शालिनी तलवार 2011 मध्ये लग्नबंधनात अडकले होते. 2021 मध्ये हनी सिंह आणि शालिनी यांनी घटस्फोटासाठी दिल्लीच्या कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली होती.
शालिनीने हनी सिंहवर कौटुंबिक हिंसाचार तसेच मानसिक छळाचे आरोप केले होते. त्यानंतर त्यांच्या घटस्फोटाचा खटला न्यायालयात सुरू होता. न्यायालयाने हनी सिंहला घटस्फोटाआधी त्यांच्या नात्यास आणखी एक संधी देण्यास सांगितलं होतं. त्यावेळी रॅपर म्हणाला होता,”आता शालिनीसोबत राहण्यात काही अर्थ नाही”.
हनी सिंहचा संसार तुटला…
यो यो हनी सिंह आणि शालिनी तलवार यांची लव्हस्टोरी खूप खास आहे. लग्नाआधी अनेक वर्षे ते एकमेकांना डेट करत होते. अखेर 2011 मध्ये ते लग्नबंधनात अडकले. संसार थाटल्यानंतर सुरुवातीला त्यांच्यात सर्वकाही अलबेल होतं.















Discussion about this post