महाराष्ट्रातील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज सकाळी ८ वाजेपासून सुरु आहे. दरम्यान, या निवडणुकीचे कल आणि अंतिम निकाल आता समोर आले असून दोन्ही मतदारसंघांमध्ये महायुतीच्या उमेदवारांचा विजय झाला आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले होते. या निवडणुकीच्या निकाल आज जाहीर होत असून यामध्ये महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी सुरुवातीपासूनच आपली पकड मजबूत ठेवली होती. तेविसाव्या फेरी अखेरीस सुनेत्रा पवार यांना २ लाख १४ हजार ५९ मतांची आघाडी घेतली आहे. ही आघाडी कायम राहिल्याने सुनेत्रा पवार यांचा विजय सुकर झाला आहे.
दुसरीकडे भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरीमध्ये पोटनिवडणूक पार पडली, या पोटनिवडणुकीची मतमोजणीही आजच पार पडली. येथे महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये अतिशय अटीतटीची लढत पाहायला मिळाली. दोन्ही बाजूंच्या उमेदवारांनी सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये एकमेकांना कडवी झुंज दिली.
मात्र, मतमोजणीच्या अंतिम टप्प्यात येथील मतदारांनी दिलेल्या स्पष्ट कौलामुळे एका उमेदवाराने निर्णायक आघाडी घेत विजय निश्चित केला. राहुरी पोटनिवडणुकीत अक्षय कर्डिले यांनी १ लाखांहून अधिकचे मताधिक्य मिळवले. त्यांच्या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला त्यांच्या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.















Discussion about this post