नवी दिल्ली: काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हरियाणातील गुरुग्राम येथील प्रसिद्ध ‘मेदांता’ रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका लहान वैद्यकीय शस्त्रक्रियेसाठी त्यांना रुग्णालयात आणले गेले होते.
सध्या मेदांता रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाच्या मार्गदर्शनाखाली सोनिया गांधी यांच्यावर उपचार सुरू आहेत. शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती आता पूर्णपणे स्थिर असून काळजी करण्याचे कोणतेही कारण नसल्याचे समजते आहे. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. सोनिया गांधी रुग्णालयात दाखल झाल्याचे वृत्त समजताच काँग्रेस नेत्यांसह कार्यकर्त्यांकडून त्या लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी प्रार्थना केली जात आहे.















Discussion about this post