मुंबई । मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टी (CJP) कडून मुंबईतील शिवाजी पार्क येथे आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलनस्थळी मंचावर उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी महात्मा गांधींचे चित्र असलेले टी-शर्ट परिधान केले होते.

CJP च्या मुंबईतील आंदोलनात कार्यकर्त्यांनी “कॉक्रोच माझं नाव, Gyanesh Kumar Must Go” अशा घोषणा देत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. एसआयआर (SIR) प्रक्रिया आणि मतदार यादीतील कथित अनियमिततांवर प्रश्न उपस्थित करत CJP कडून हे आंदोलन करण्यात आलं.

सीजेपी आंदोलनातील गर्दीत अचानक एक दिल्लीचा कॉक्रोच अवतरला. ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा हीच आमची प्रमुख मागणी आहे. त्यांनी जी चूक केलीय, त्याची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या कॉक्रोचने केली आहे. ज्ञानेश कुमार यांनी नियमांचे उल्लंघन केले आहे. अशा व्यक्तीला त्या पदावर बसण्याचा अधिकार नाही, असंही हा तरूण म्हणाला. दोन-तीन दिवसांत नक्कीच ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेतील, असेही तो म्हणाला. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, CJPचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी यावेळी देशातील महापुरुषांचा उल्लेख करत भाष्य केले. “जेव्हा भारताचे पंतप्रधान अमेरिकेला भेट देतात, तेव्हा ते गांधीजींच्या देशातून आले आहेत, असे अनेकदा म्हटले जाते. गांधीजी देशाचा आत्मा आहेत, आंबेडकर कणा आहेत आणि नेहरू मेंदू आहेत,” असे दिपके म्हणाले.














Discussion about this post