जळगाव : जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत गांजाच्या लागवडीचा पर्दाफाश केला आहे. चोपडा तालुक्यातील खान्या-पाडाव शिवारातील वनविभागाच्या कंपार्टमेंट क्रमांक २४० मध्ये गांजाची लागवड करण्यात आल्याचे उघडकीस आले.
चोपडा ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून तब्बल १ हजार ८७० किलो गांजासदृश्य अमली पदार्थ जप्त केला आहे. या मुद्देमालाची किंमत सुमारे ४ कोटी ६७ लाख ५० हजार रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
या प्रकरणी जुम्मा आरसी पावरा याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, कारवाईनंतर आरोपी फरार झाला आहे. पोलीस निरीक्षक संजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजासदृश्य पदार्थ जप्त झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.














Discussion about this post