Sunday, April 19, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

दिवाळी, छट पुजेनिमित्त मध्य रेल्वेकडून आणखी १८२ विशेष गाड्याची घोषणा.. जळगावकरांनाही होईल फायदा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 13, 2025
in जळगाव जिल्हा
0
प्रवाशांची होणार गैरसोय! उद्यापासून एक महिना भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस या स्टेशनपर्यंत धावणार
बातमी शेअर करा..!

जळगाव । दिवाळी तसेच छट पुजेनिमित्त होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे प्रशासनाने यापूर्वी ९४४ विशेष गाड्या यापूर्वी जाहीर केल्या होत्या. आता आणखी १८२ विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. त्यापैकी काही रेल्वे गाड्या या जळगावसह भुसावळ स्थानकावर थांबणार असून यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासा मिळेल.

सणासुदीच्या दिवसात लांब पल्ल्याच्या बऱ्याच रेल्वे गाड्या तिकडून भरून येतात. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांना त्या गाड्यांमध्ये जागा मिळत नाही. गर्दीमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असते. ही स्थिती लक्षात घेता दिवाळी आणि छट पुजेनिमित्त सुरू करण्यात येणाऱ्या विशेष रेल्वे गाड्यांमुळे प्रवाशांना काहीअंशी दिलासा मिळू शकेल.

मध्य रेल्वेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, लोकमान्य टिळक टर्मिनस–दानापूर–लोकमान्य टिळक टर्मिनस द्विसाप्ताहिक विशेष रेल्वेच्या एकूण ४० फेऱ्या होतील. ०१०१७ द्विसाप्ताहिक विशेष गाडी २७ सप्टेंबर ते एक डिसेंबर या कालावधीत प्रत्येक सोमवारी आणि शनिवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १२.१५ वाजता सुटेल आणि दानापूर येथे दुसऱ्या दिवशी २२.४५ वाजता पोहोचेल. ०१०१८ द्विसाप्ताहिक विशेष गाडी २९ सप्टेंबर ते तीन डिसेंबर या कालावधीत प्रत्येक सोमवारी आणि बुधवारी दानापूर येथून रात्री १२.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १२.०० वाजता पोहोचेल.

लोकमान्य टिळक टर्मिनस–मऊ–लोकमान्य टिळक टर्मिनस द्विसाप्ताहिक विशेष रेल्वे गाडीच्या एकूण ४० फेऱ्या होतील. ०११२३ द्विसाप्ताहिक विशेष गाडी २६ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक शुक्रवारी आणि रविवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १२.१५ वाजता सुटेल आणि मऊ येथे तिसऱ्या दिवशी ०५.३५ वाजता पोहोचेल. ०११२४ द्विसाप्ताहिक विशेष गाडी २८ सप्टेंबर ते दोन डिसेंबर या कालाधीत प्रत्येक रविवारी आणि मंगळवारी मऊ येथून ०७.३५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी रात्री १०.२० वाजता पोहोचेल.

याशिवाय, लोकमान्य टिळक टर्मिनस–बनारस–लोकमान्य टिळक टर्मिनस द्विसाप्ताहिक विशेष रेल्वे गाडीच्या ४० फेऱ्या होतील.०१०५१ द्विसाप्ताहिक विशेष गाडी २४ सप्टेंबर ते २७ नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक बुधवारी आणि गुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १२.१५ वाजता सुटेल आणि बनारस येथे तिसऱ्या दिवशी ०१.१० वाजता पोहोचेल. ०१०५२ द्विसाप्ताहिक विशेष गाडी २६ सप्टेंबर ते २९ नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक शुक्रवारी आणि शनिवारी बनारस येथून ०६.३५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०४.४० वाजता पोहोचेल. वरील तिन्ही गाड्यांना भुसावळ आणि जळगाव रेल्वे स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे तिन्ही विशेष गाड्यांना प्रत्येकी दोन वातानुकूलित द्वितीय, आठ वातानुकूलित तृतीय, चार शयनयान, सहा सामान्य द्वितीय आणि एक सामान्य द्वितीय आसन व्यवस्था असणार आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

10च्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! परीक्षा फॉर्म भरण्याची तारीख ठरली

Next Post

‘मुख्यमंत्री साहेब…..’; आरक्षणाच्या मुद्द्यावरून बंजारा समाजातील तरुणाने आयुष्य संपवलं

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
‘मुख्यमंत्री साहेब…..’; आरक्षणाच्या मुद्द्यावरून बंजारा समाजातील तरुणाने आयुष्य संपवलं

‘मुख्यमंत्री साहेब…..’; आरक्षणाच्या मुद्द्यावरून बंजारा समाजातील तरुणाने आयुष्य संपवलं

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
पशुपालकांसाठी सुवर्णसंधी; पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्डद्वारे ३ लाखांपर्यंत अर्थसहाय्य

पशुपालकांसाठी सुवर्णसंधी; पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्डद्वारे ३ लाखांपर्यंत अर्थसहाय्य

April 19, 2026
मोठी घडामोड! सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड, राज्यसभा खासदारकीचा दिला राजीनामा

सुनेत्रा पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या ३५ पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

April 19, 2026
संसदेच्या आवारातील आंदोलन भोवलं! केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंसह महिला खासदार पोलिसांच्या ताब्यात

संसदेच्या आवारातील आंदोलन भोवलं! केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंसह महिला खासदार पोलिसांच्या ताब्यात

April 18, 2026
जळगाव सिव्हिल हॉस्पिटलबाहेरून रिक्षा पळवणारा चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

जळगाव सिव्हिल हॉस्पिटलबाहेरून रिक्षा पळवणारा चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

April 18, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page