बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या अनुभवी उमेदवारांसाठी बँक ऑफ इंडिया (BOI) मध्ये नोकरीची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. बँक ऑफ इंडियाने जनरल बँकिंग ऑफिसर (GBO) शाखेतील ७७९ क्रेडिट ऑफिसर पदांसाठी संक्षिप्त अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.
या भरती अंतर्गत विविध वेतनश्रेणींमधील पदे भरली जाणार असून, यासाठीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ३० जून २०२६ पासून सुरू झाली आहे. या भरतीची सविस्तर अधिसूचना लवकरच बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ३० जून २०२६ पासून सुरू होईल.
कोण अर्ज करू शकतात?
एमएमजीएस-II आणि एमएमजीएस-III पदांसाठी, उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना किमान ६०% गुण असणे आवश्यक आहे, तर एससी, एसटी, ओबीसी आणि दिव्यांग उमेदवारांना ५५% गुण असणे आवश्यक आहे. एमबीए, पीजीडीबीएम, सीए, सीएफए, सीएमए-आयसीडब्ल्यूए किंवा बँकिंग आणि फायनान्समधील पदव्युत्तर पदवी असलेले उमेदवार देखील अर्ज करण्यास पात्र आहेत.
एसएमजीएस-IV पदासाठी, पदवीसह एमबीए, पीजीडीबीएम, पदव्युत्तर पदवी किंवा सीए, सीएफए, सीएमए-आयसीडब्ल्यूए यांसारखी व्यावसायिक पात्रता आवश्यक आहे.
एमएमजीएस-II साठी वयोमर्यादा २५ ते ३५ वर्षे, एमएमजीएस-III साठी २८ ते ३८ वर्षे आणि एसएमजीएस-IV साठी ३० ते ४० वर्षे आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत मिळेल.
अर्ज कसा करावा?
सर्वप्रथम, बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत करिअर वेबसाइटला भेट द्या.
“बीओआय क्रेडिट ऑफिसर रिक्रूटमेंट २०२६” या लिंकवर क्लिक करा.
“नवीन नोंदणी” (New Registration) वर क्लिक करा आणि आपले नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी प्रविष्ट करा.
नोंदणीनंतर मिळालेल्या आयडी आणि पासवर्डने लॉगिन करा.
अर्जामध्ये आवश्यक असलेली वैयक्तिक, शैक्षणिक आणि अनुभवाची माहिती भरा.
पासपोर्ट-आकाराचा फोटो, सही आणि इतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
आपल्या प्रवर्गानुसार अर्ज शुल्क ऑनलाइन भरा.
अर्ज काळजीपूर्वक तपासा आणि सबमिट करा.















Discussion about this post