मुंबई । राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने बौद्ध भाविकांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भगवान गौतम बुद्धांच्या पावन भूमीचे दर्शन घडवून आणण्यासाठी “बौद्ध तीर्थक्षेत्र विशेष रेल्वे यात्रा – बौद्ध गया दर्शन” या विशेष कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक न्याय मंत्री संजयजी शिरसाट यांच्या नेतृत्वात ही पवित्र यात्रा आयोजित करण्यात आली आहे.
या यात्रेच्या माध्यमातून भाविकांना बौद्ध गया या पवित्र तीर्थक्षेत्राला भेट देण्याची आणि भगवान बुद्धांच्या पावन स्मृतींना वंदन करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
भाविकांच्या सोयीसाठी ही विशेष रेल्वे यात्रा एकूण तीन वेगवेगळ्या टप्प्यांत आणि महाराष्ट्रातील तीन प्रमुख शहरांतून सुटणार आहे. पहिला टप्पा 15 मे रोजी सुरू होईल. दुसरा टप्पा 25 मे रोजी सुरू होईल. तर तिसरा टप्पा 3 जून रोजी सुरू होईल. पहिला टप्पा हा छत्रपती संभाजीनगर ते बौद्ध गया अले. दुसरा टप्पा नागपूर ते बौद्ध गया असा असेल तर तिसरा टप्पा दादर (मुंबई) ते बौद्ध गया असा असेल. या प्रवासादरम्यान निवास, भोजन तसेच रेल्वे प्रवास मोफत असेल.

प्रवास, राहणे आणि जेवण मोफत!
या पवित्र यात्रेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे भाविकांसाठी या संपूर्ण प्रवासादरम्यान आरामदायी रेल्वे प्रवास, निवास (राहण्याची) व्यवस्था, भोजन (जेवणाची) व्यवस्था, तसेच स्थानिक पर्यटन व दर्शन व्यवस्था अशा सर्व सोयी-सुविधा मोफत आणि अत्यंत दर्जेदार पद्धतीने पुरवल्या जाणार आहेत. बुद्धांच्या शांतता, समता आणि मानवतेच्या संदेशाला अभिवादन करत, अधिकाधिकनागरिकांनी या पवित्र यात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.















Discussion about this post