मुंबई । यापुढे बालवाडी ते चौथी पर्यंतची (प्री प्रायमरी ते चौथी) शाळा सकाळी 9 वाजता अथवा 9 वाजेनंतर भरवण्याची सूचना राज्य सरकारने सर्व शाळांना केली आहे. या संदर्भातील परिपत्रक गुरुवारी जारी करण्यात आले.
विशेष म्हणजे राज्यपाल रमेश बैसे यांनी 5 डिसेंबर 2023 रोजी आयोजित कार्यक्रमात याबाबत महत्त्वाची सूचना केली होती. त्यांनी शालेय शिक्षण विभागाला सकाळच्या सत्रातील शाळांच्या वेळेबाबत विचार करण्याची सूचना दिली होती
राज्य सरकारने आदेशात नेमकं काय म्हटलं आहे?
शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागामार्फत सहा प्रोत्साहनात्मक योजनाचा शुभारंभ करण्यासाठी राजभवनात दिनांक 5 डिसेंबर 2023 ला कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाषणादरम्यान राज्यपाल महोदय रमेश बैस यांनी शालेय शिक्षण विभागाला सकाळच्या सत्रातील शाळांच्या वेळेबाबत विचार करण्याबाबत सूचना केली होती.
राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयामार्फत राज्यातील विविध शाळांच्या वेळा विचारात घेऊन शाळांची वेळ बदलण्याविषयी अभ्यास करण्यात आला. सदर अभ्यास करण्यासाठी राज्यातील शिक्षण तज्ज्ञ, शिक्षण प्रेमी, पालक, तसेच प्रशासनातील अधिकारी यांचे देखील अभिप्राय नोंदविण्यासाठी गुगल लिंक उपलब्ध करून देण्यात आली होती.
महत्वाच्या बाबी समोर आल्या आहेत:-
1. बदलेली जीवनशैली, मनोरंजनाची विविध साधने, रात्री उशिरापर्यंत होणारे ध्वनिप्रदूषण (उदा. वाहनांचे आवाज, विविध कार्यक्रमांत वाजवले जाणारे कर्कश संगीत) यामुळे विद्यार्थ्यांचे उशिरापर्यंत जागरण होते.
2.पालकांच्या मते झोप पुरेशी होत नसल्याने विद्यार्थी सकाळी लवकर उठण्यास कंटाळा करतात.
3. पावसाळा, हिवाळ्यात लवकर उठून शाळेत जाण्याचा विद्यार्थ्यांना त्रास होतो. आजारी पडतात.
4. मुलांना तयार करणे,डबा तयार करणे,वेळेवर शाळेत सोडणे यामुळे अनेक पालकांची अोढाताण होते.परिपत्रक जारी करत राज्य सरकारची शाळांना सूचना















Discussion about this post