जळगाव । गेल्या तीन-चार दिवसांपासून मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत उत्तरेकडून येणारे थंड वारे वाहत असल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील पारा १० डिग्री सेल्सिअसच्या आत येऊन गारठा वाढला होता. हा गारठा दोन दिवसांत कमी होणार आहे. आता ३० जानेवारी ते ३ फेब्रुवारीपर्यंत तापमानात वाढ होऊन थंडीचा जोर कमी होईल. किमान तापमान १४ ते १६ डिग्री सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
कमाल तापमान ३१ ते ३४ डिग्री दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. कमाल तापमानात वाढ होताच दपारच्या वेळी काही प्रमाणात उष्णवातावरण तयार होईल. त्यानंतर जळगावसह खान्देशात एक ते दोन दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून थंडी वाजणार नाही. अर्थात, उन्हाळ्याची चाहूल लागेल.
कारण तसे संकेत गेल्या दोन दिवसांपासून मिळताहेत. वाऱ्याचा वेगही मंदावला आहे. ताशी सरासरी ११ किमी वेगाने वाहणारे वारे सध्या पाच ते सात किमी वेगाने वाहताहेत. आकाशही निरभ्र आहे, अशी माहिती हवामान अभ्यासक नीलेश गोरे यांनी दिली. दरम्यान, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात आकाश किंचित आभ्राच्छादित राहण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे















Discussion about this post