पुणे । आगामी काही महिन्यात लोकसभेसह विधान सभा निवडणूक होणार आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पुण्यातच अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. अजितदादांच्या समर्थक नेत्याने शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
अजित पवार यांचे खंदे समर्थक डॉ. शैलेश शिवाजीराव मोहिते पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. शैलेश मोहिते यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन हाती बांधून घेतलं. समर्थांसह मोहिते यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. तळेगावमध्ये आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत शैलेश मोहितेंचा शिवसेनेत पक्षप्रवेश झाला आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला खेड, राजगुरूनगरमध्ये त्यांनी धक्का दिलाय. आमदार दिलीप मोहितेंचे चुलत पुतणे शैलेश मोहितेंना ठाकरेंनी शिवबंधनात बांधून घेतलं आहे. तळेगावमध्ये आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत शैलेश मोहितेंचा शिवसेनेत पक्षप्रवेश झाला. यापूर्वी पिंपरी चिंचवड मधील अजित पवारांचे निकटवर्तीय आणि माजी महापौर संजोग वाघेरेंना ही उद्धव ठाकरेंनी स्वतःकडे खेचलं होतं. मावळ लोकसभेत वाघरेंच्या रूपाने तर आता शिरूर लोकसभेत शैलेश मोहितेंच्या रूपाने ठाकरेंनी अजित पवारांना धक्के दिलेत.















Discussion about this post