जळगाव : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा नेते नाना पटोले हे आज जळगाव दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सरकारवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचं काम कमी केलं आणि भाजपाच्या प्रचाराचे काम अधिक केले आहे. मोदी हे दक्षिणेकडे प्रचार वाढवणार असून मोदी सरकारला पुढच्या काळात देशात जागा नसल्याचे पटोले यांनी सांगितले.
तसेच यावेळी विखे पाटील यांच्या काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपात येणार; या विधानावरही टोला साधला आहे. त्यांनी विखे पाटील यांच्यावरही टोला लगावला. विखे पाटील तुम्ही मंत्री आहात. राज्यात असंख्य प्रश्न शेतकऱ्यांचे, बेरोजगारांचे आहे; यावर लक्ष द्या. काँग्रेसवर लक्ष करू नये; अशा शब्दात नाना पटोले यांनी टीका केली.
ओबीसींवर बोलताना पटोले यांनी सांगितले कि, धर्मवादाच्या आधारावर जे काही राजकारण उभं केलं. त्याच्यामुळे मत विभाजन झालं आणि त्याच्यामुळे मोदी सरकार आले हे सर्व ओबीसींच्या मत विभाजनामुळे झाले आहे. प्रत्येकाला आपल्या पक्षाचा प्रचार करण्याचा अधिकार आहे. उद्धव ठाकरे हे दिल्ली जाणार आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून मोदी सरकार उतरण्याचे काम सुरू आहे. निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे जागा वाटपाच्या हालचाली सुरू झाल्याने ते जातील. उद्धव ठाकरे हे आमच्या अलायन्समध्ये आहे.















Discussion about this post