Monday, August 24, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

विद्यार्थ्यांनी सातत्याने नाविन्यपूर्ण संशोधन करण्याची गरज ; प्रा. उदय अन्नापुरे

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 12, 2023
in जळगाव जिल्हा
0
विद्यार्थ्यांनी सातत्याने नाविन्यपूर्ण संशोधन करण्याची गरज ; प्रा. उदय अन्नापुरे
बातमी शेअर करा..!

जळगाव । नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात पदवीस्तरावर देखील संशोधनाला महत्व देण्यात आले असल्यामुळे विद्यार्थ्यांनी सातत्याने नाविन्यपूर्ण संशोधन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मुंबई येथील इंडियन केमिकल टेक्नॉलॉजीच्या जालना येथील कॅम्पसचे संचालक प्रा. उदय अन्नापुरे यांनी केले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यापीठस्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे, व्य.प. परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे यांची उपस्थिती होती. मंचावर विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, अविष्कारचे समन्वयक प्रा. जयदीप साळी, उपसमन्वयक डॉ. जितेंद्र नारखेडे उपस्थित होते.

प्रा. अन्नापुरे म्हणाले की, गरज ही शोधाची जननी आहे. कुतूहल अथवा उत्सुकता ही शोधासाठी प्रवृत्त करत असते. संशोधन ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. त्याला शेवट नाही. संशोधनात अनेक आव्हाने आहेत. काहींचा अंदाज लावता येतो तर काहींचा अंदाज लावणे शक्य नाही. संशोधनात निराकारण केल्यानंतरही नवनवीन प्रश्न उभे राहत असतात. त्याच्या निराकरणासाठी जगळे जग एकत्र येवून काम करते. हे आपण कोवीडच्या काळात अनुभवले. माणूसकी हाच फक्त एक धर्म समजून लस शोधण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले. नवी पिढी अत्यंत गतीमान असून अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडे आहेत. त्यांनी वेळेचे व्यवस्थापन करून अनुत्पादक वेळ वाया न घालवता संशोधनात गुंतवून घ्यावे याचा फायदा समाजाला होईल असे आवाहन प्रा. अन्नापूरे यांनी केले.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांनी संशोधनात धैर्य, चिकाटी, आवड, हे गुण गरजेचे आहेत. कॉपी पेस्ट न करता नाविन्यपूर्णता आणा, नेहमीचा विचार न करता नवीन विचार करण्याची सवय लावा. आकलन, अवलोकन आणि विश्लेषण क्षमता वृध्दींगत करा, सोबतच गुणवत्तापूर्ण संशोधन करा अशा काही टिप्स प्रा. माहेश्वरी यांनी दिल्या. प्रारंभी प्रा. जयदीप साळी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. वीणा महाजन व प्रा. पुरूषोत्तम पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. उपसमन्वयक डॉ. जितेंद्र नारखेडे यांनी आभार मानले. यावेळी जिल्हास्तरावर झालेल्या अविष्कार संशोधन स्पर्धेच्या संयोजक महाविद्यालयांचे प्राचार्य, समन्वयक व उपसमन्वयक यांचा कुलगुरूंच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

ही संशोधन स्पर्धा दि. १३ डिसेंबरपर्यंत होणार असून ५६३ विद्यार्थ्यांच्या ३४७ प्रवेशिका या स्पर्धेत आहेत. पदवी, पदव्युत्तर आणि संशोधक या तीन गटांमध्ये १) कृषी व पशुसंवर्धन २) वाणिज्य, व्यवस्थापन व विधी ३) अभियांत्रिकी व तंत्रज्ञान ४) मानव्य विज्ञान, भाषा व ललितकला ५) वैद्यकीय व औषधीनिर्माण शास्त्र ६) विज्ञान या विषयातील मोड्युल व पोस्टर्स द्वारे विद्यार्थ्यांनी आपले संशोधन सादर केले. उद्या १३ डिसेंबर रोजी सायं. ४.३० वाजता कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली पारितोषिक वितरण समारंभ होईल.

बातमी शेअर करा..!
Previous Post

मी मुख्यमंत्री असतो तर…; उद्धव ठाकरेंचे राज्य सरकारवर हल्लाबोल

Next Post

रेल्वेखाली आल्याने ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू ; आसोदा-भादली दरम्यानची घटना

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भुसावळात विजेच्या धक्क्याने २१ वर्षीय तरुण मजुराचा मृत्यू

रेल्वेखाली आल्याने ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू ; आसोदा-भादली दरम्यानची घटना

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
आचारसंहिता संपताच राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 19 धडाकेबाज निर्णय ; जाणून घ्या

आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत ४ मोठे निर्णय

August 24, 2026
कक्ष अधिकारी पदोन्नतीसाठीच्या विभागीय परिक्षेसंदर्भातील निकषाबाबत महिन्याभरात बैठक घेणार – मंत्री गुलाबराव पाटील

पाळधी-तरसोद बायपासच्या डांबरीकरणात मोठा भ्रष्टाचार? पालकमंत्र्यांच्या आरोपाने खळबळ

August 24, 2026
तुकाराम मुंढेंची भेसळखोरांवर नजर; तुमचं दूध किती शुद्ध? कसे ओळखायचे?

तुकाराम मुंढेंची भेसळखोरांवर नजर; तुमचं दूध किती शुद्ध? कसे ओळखायचे?

August 24, 2026
RBI कडून जुलै महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची यादी जारी, एका क्लिकवर पाहा सुट्ट्यांची यादी

लागोपाठ ४ दिवस बँका बंद राहणार, पाहा कारण आणि तारीख

August 24, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page