युनियन बँक ऑफ इंडियामध्ये भरती प्रक्रिया ही सुरू असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. पदवीधरांसाठी ही सुवर्णसंधी आहे. गेल्या काही दिवसांपासून विविध बँकांमध्ये बंपर भरती प्रक्रिया सुरू असल्याचे बघायला मिळतंय. आता अशीच एक भरती प्रक्रिया ही युनियन बँक ऑफ इंडियाकडून राबवली जातंय. थेट युनियन बँक ऑफ इंडियामध्ये काम करण्याची संधी असणार आहे.
उशीर न करता या भरती प्रक्रियेसाठी लवकरात लवकर आपले अर्ज हे दाखल करावेत. विशेष म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना भारतातील प्रमुख शहरांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. तुम्ही कोणत्याही शाखेचे पदवीधर असाल तरीही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता.
युनियन लर्निंग अकादमी हेड्स या पदांसाठी ही भरती होणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करावा लागणार आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेत एकून सात जागा भरल्या जाणार आहेत. यासाठीच हे अर्ज मागवण्यात आले. परत एकदा लक्षात ठेवा की, अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 21 डिसेंबर 2023 आहे.
अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून घेतलेली पदवी असावी. तसेच जर उमेदवाराकडे बँकेत नोकरी करण्याचा अनुभव असेल तर त्याला प्राधान्य दिले जाईल. या भरती प्रक्रियेत उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून घेतली जाईल. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे कमीत कमी 30 तर जास्तीच जास्त 50 असावे.
जाहिरात पहा : PDF















Discussion about this post