जळगाव । जळगाव शहरातील सत्यम पार्कजवळील रेल्वे मालधक्क्याजवळ रेल्वेचा धक्का लागल्याने विजय नवल पवार या २४ वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज रविवारी सकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वि
जळगाव शहरातील सत्यमपार्क परिसरात कुटुंबियांसह वास्तव्यास असलेला विजय पवार हा आज सकाळी शौचालयासाठी जवळच्या रेल्वे मालधक्काजवळील रेल्वेरूळाजवळ गेला.
त्यावेळी डाऊन रेल्वे लाईनवरील रेल्वे खंबा क्रमांक ३०३ च्या ३६ स्पॉट जवळ त्याला एका धावत्या रेल्वेचा जोरदार धक्का लागला. या अपघात त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव तालुका पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला. मृतदेह तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ अनिल फेगडे करीत आहे.















Discussion about this post