सोलापूर । सोलापूर शहरातील जिल्हा कारागृहात प्रवेशद्वारावर गार्ड म्हणून सेवेत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःवरच तीन गोळ्या झाडून घेतल्याची धक्कादायक घटना घडली. विकास गंगाराम कोळपे असे त्यांचे नाव असून या घटनेने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली. सुरूवातीला शासकीय रुग्णालयात उपचार करून त्यांना अत्यवस्थ स्थितीत खासगी रुग्णालयात हलविण्यात आले
गोळ्याझाडून घेतलेले विकास हे मूळचे पुणे जिल्ह्यातील देवाची आळंदी येथील रहिवासी आहेत.दोन वर्षांपूर्वी त्यांची बदली झाली आणि ते सोलापुरातील (Solapur) जिल्हा कारागृहात आले. त्यांनी यापूर्वी २०१३ मध्ये कोल्हापूर, २०१६ येरवडा जेल पुणे,२०१७ अहमदनगर, २०१९ सांगली आणि २०२१ मध्ये सोलापूर जिल्हा कारागृहात मुख्य प्रवेशद्वारात गार्ड म्हणून कार्यरत होते.
त्यांनी स्वतःजवळील एसएलआर बंदुकीतून स्वतःवर तीन गोळ्या झाडून घेतल्या. विकास कोलपे यांनी स्वत:वर गोळ्याझाडून घेण्यापूर्वी आपल्या फेसबुक अकाउंटवर जन्म आणि मृत्यूची तारीख टाकून भावपूर्ण श्रद्धांजली सिंघम असे नमूद केले आहे. यात वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून मानसिक खच्चीकरण झाल्याचे म्हटले आहे. दोन महिन्यातील ही तिसरी घटना आहे. गोळ्याझाडून घेतलेल्या विकास यांच्यावर अतिदक्षता विभागात युद्धपातळीवर उपचार सुरु आहेत.















Discussion about this post