जामनेर । शेती वाटणीच्या वादातुन मुलाने बापाच्या फावडे घालुन खून केल्याची घटना जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील तरंगवाडी शिवारात घडली. याबाबत आरोपीच्या मुलाने बापा विरोधात फिर्याद दिली असून त्यानुसार पहुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येथील शेतकरी मयत नाना बडगुजर (वय ८२) हे सकाळच्या सुमारास शेतात कपाशी वेचत होते. यावेळी त्यांचा मुलगा आरोपी कैलास नाना बडगुजर (वय ५६) हा शेतात आला आणि वडीलांसोबत वाटणीवरून वाद घालू लागला. वडीलांनी नकार दिला असता त्यांच्यात शाब्दीक वाद झाला आणि आरोपी कैलास याने वडील नाना बडगुजर यांच्या डोक्यात भुसा भरण्याच्या पावडयाने डोक्यात जोरात वार करताच नाना बडगुजर हे जागेवरच कोसळले.
आरोपीचा मुलगा आणि त्याची पत्नी शेतात काम करीत होते. विशाल याने डोक्यात वार केल्याचे बघताच धाव घेत आरोपी वडीलांच्या हातुन पावडे हिसकावून जखमी बाबांना सावरण्याचा प्रयत्न केला. ते कोणतीही हालचाल करीत नसल्याचे बघुन आरोपी याने शेतांमधुन पळ काढला. सदर घटनेची फिर्याद आरोपीचा मुलगा विशाल कैलास बडगुजर (वय ३३) याने दिलेल्या फिर्यादीवरून भादवी कलम ३०२ नुसार गुरं ४९१ / ३०२ नुसार पहुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय दिलीप पाटील करीत आहे.















Discussion about this post