मुंबई : सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेल्या एका गौप्यस्फोटामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. तुम्ही सरकारमध्ये सामील व्हा, मी राजीनामा देतो, असं शरद पवारांनीच आपल्याला सांगितलं असा खळबळजनक खुलासा अजित पवार यांनी केला. आता यानंतर शरद पवार यांनी आज तातडीने बैठक बोलावली आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, खासदार तसेच पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.
अजित पवारांच्या या गौप्यस्फोटामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान,
पुण्यात दुपारी २ वाजता ही बैठक होणार असून बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह सुप्रिया सुळे यांची देखील उपस्थिती राहणार आहे. अजित पवार यांनी केलेल्या आरोपांवर या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान, बैठकीनंतर सायंकाळी ४ वाजता शरद पवार पत्रकारपरिषद घेणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे अजित पवार यांनी केलेल्या आरोपांवर आता शरद पवार काय उत्तर देणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे.















Discussion about this post