Friday, February 13, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत जनजागृती करावी – कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 2, 2023
in जळगाव जिल्हा
0
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत जनजागृती करावी – कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी
बातमी शेअर करा..!

जळगाव – शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून पदवीस्तरावर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, संस्थाचालक आणि प्राध्यापक यांनी सज्ज रहावे व पुढील तीन महिन्यांच्या कालावधीत सर्व शैक्षणिक घटकांपर्यंत या धोरणाबाबत जनजागृती करावी असे आवाहन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांनी केले.

शुक्रवार दि. १ डिसेंबर रोजी विद्यापीठात व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिसभा सदस्य, संस्थाचालक, प्राचार्य आणि नोडल ऑफिसर यांच्यासाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत प्रा. माहेश्वरी बोलत होते. पदवीस्तरावर राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत पॉवर पाँईंट प्रेझेंटेशन द्वारे प्रा. माहेश्वरी यांनी दिड तास माहिती दिली. हे धोरण राबवितांना संस्थाचालक आणि प्राचार्य यांना अधिक पुढाकार घ्यावा लागणार आहे त्यासाठी आपल्या परिसरातील उद्योग, संस्था, बँका, सहकारी संस्था आदींसोबत सामंजस्य करार करावे लागतील ज्यामुळे विद्यार्थ्यांना इंटर्नशिप मिळेल असे ते म्हणाले. नवीन शैक्षणिक धोरणानुसार पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा राहणार आहे. प्रवेश घेतल्यानंतर जरी विद्यार्थ्याने शिक्षण अर्धवट सोडले तरी प्रवेशाच्या वर्षापासून सात वर्षांच्या आत तो पुन्हा उर्वरित शिक्षण पूर्ण करू शकतो. चार वर्षाच्या या पदवी अभ्यासक्रमात एक वर्षानंतर विद्यार्थ्यांला पदवी प्रमाणपत्र, दोन वर्षानंतर पदविका, तीन वर्षा नंतर पदवी आणि चार वर्षानंतर पदवी ऑनर्स ही पदवी पाप्त होणार आहे. चार वर्षांनंतर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्षाला अथवा पीएच.डी.ला विद्यार्थ्यांला पवेश मिळू शकतो. एका वर्षात विद्यार्थ्यांला ४० क्रेडीट पूर्ण करावयाचे आहेत. चार वर्षांचे १६०ते १७६ क्रेडीट राहणार आहेत. मेजर आणि मायनर विषय कसे राहतील याबद्दलची माहिती कुलगुरूंनी दिली. विद्यार्थी महाविद्यालयाकडे कसा आकर्षित होईल, तो वर्गात कसा टिकून राहील आणि त्याला प्राप्त पदवीच्या आधारावर रोजगार कसा मिळेल. हे मुद्दे महत्वाचे असल्याचे प्रा. माहेश्वरी यांनी सांगितले.

प्रारंभी प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे यांनी प्रास्ताविक केले. अधिष्ठाता प्राचार्य एस.एस. राजपूत व प्रा. अनिल डोंगरे यांनी विद्यापीठाने केलेल्या तयारीची माहिती दिली. उपस्थितांच्या शंकाचे निरसन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. सुनील पाटील यांनी केले. कुलसचिव डॉ.विनोद पाटील यांनी आभार मानले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

पारोळा तालुक्यातील विचित्र अपघातात तीन महिला जागीच ठार, २२ जण गंभीरित्या जखमी

Next Post

अजित पवारांच्या खळबळजनक आरोपानंतर शरद पवारांनी तातडीने बैठक बोलावली, करणार मोठा गौप्यस्फोट?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
मोठी बातमी! शरद पवारांना ट्विटरच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी ; राज्यातल्या राजकीय वर्तुळात खळबळ

अजित पवारांच्या खळबळजनक आरोपानंतर शरद पवारांनी तातडीने बैठक बोलावली, करणार मोठा गौप्यस्फोट?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
शिंदे गटातील ‘या’ पाच मंत्र्यांना ‘नारळ’ देण्याचे भाजप हायकमांडचे आदेश

एकनाथ शिंदे ‘भाकरी फिरणार’? २ ते ४ मंत्र्यांना डच्चू देऊन नव्या चेहऱ्यांना संधी देणार?

February 13, 2026
तरुणांनो बायोडाटा तयार ठेवा! विविध बँकांमध्ये होणार मोठी पदभरती

सरकारी बँकेत २ हजारपेक्षा जास्त पदांसाठी भरती ; अर्जाची शेवटची तारीख जवळ आली

February 13, 2026
महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीने शिक्षक नेमण्यास सुरुवात

प्राध्यापक भरतीसाठी राज्य शासनाचा सुधारित अध्यादेश; नव्या नियमांवरून वाद पेटला, वाचा काय आहे नवा पेच

February 13, 2026
जळगावात गारठा कमी होऊन तापमान वाढणार ; वाचा हवामान खात्याचा अंदाज

थंडी झाली गायब ! फेब्रुवारीतच उन्हाची तीव्रता वाढल्याने नागरिक हैराण

February 13, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page