जळगाव । जिल्हापेठ पोलीसांनी दुचाकी चोरट्याला अजिंठा चौकातून अटक केली आहे. त्याच्याकडून सात दुचाकी हस्तगत केल्या असून अटक केलेल्या चोरट्यावर वेगवेगळ्या स्वरूपाचे सात गुन्हे दाखल आहे. राकेश पंडीत भाट (वय-२४) रा. मोठे वाघोदे ता. रावेर असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
जळगाव जिल्ह्यातील विविध भागात दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या असून याच अनुषंगाने जिल्हा पेालीस अधिक्षक एम.राजकुमार यांनी कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हापेठ पोलीसांनी चौकशीला सुरूवात केली. दरम्यान, सीसीटीव्ही आणि जनरल फुटेजच्या आधारे संशयित आरोपी हा जळगाव शहरातील संशयित आरोपी अजिंठा चौकात असल्याची गोपनिय माहितीनुसार पोलीसांनी सापळा रचून संशयित आरोपी राकेश भाट याला अटक केली. त्यांच्या कसून चौकशी केली असता त्याने सात ठिकाणी दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे.
संशयित आरोपी राकेश भाट याच्यावर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात ४, भुसावळ शहरात १, एमआयडीसी पोलीस ठाण्यात २ असे एकुण ७ ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोहेकॉ सलीम तडवी, पोलीस नाईक जुबेर तडवी, पोकॉ अमितकुमार मराठे, पोकॉ रविंद्र साबळे आणि तुषार पाटील यांनी ही करवाई केली.















Discussion about this post